Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा नाराज? मंत्रिमंडळ बैठकीतील गैरहजरीवरून पुन्हा तर्कवितर्कांना उधाण

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजर नसल्याने ते कमालीचे नाराज असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र अनुपस्थितीबाबत त्यांच्या कार्यालयाकडून काहीही माहिती देण्यात आली नाही. पण दबक्या आवाजात त्यांच्या नाराजीची चर्चा सुरु आहे तर नाराजी बाबतची अनेक कारणे समोर येत असून त्यातून सरकार संकटात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजेरी मागचे नेमके कारण समोर आले नाही. परंतु पडद्यामागे खूप मोठ्या हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला गेल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा निवासस्थानी गणेशोत्सवात वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बसलेल्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी तसेच बॉलिवूडचे अनेक मोठमोठे सिनेस्टार, याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर बसलेल्या गणपतीचे दर्शन घेतलं होते. पण या संपूर्ण दहा दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘वर्षा’ बंगल्यावर गेले नाहीत. त्यावेळीच ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ते आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नाराजीबाबत आज आणखी एका बातमीची भर पडली.

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर तसेच अर्थखाते आल्यानंतर अजित पवार कमालीचे कार्यरत झाले होते होते आपल्या विभागासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांच्या देखील ते मॅरेथॉन बैठका घेत होते राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या महत्त्वाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दगावलेल्या रुग्णांच्या प्रकरणावर चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या दोन्ही घटनांचा आढावा घेतला. तसेच प्रशासनाला काही सूचनाही दिल्या. याशिवाय विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीला प्रत्येक विभागाचे मंत्री उपस्थित होते. पण उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत.

अजित पवार सध्या त्यांच्या देवगिरी निवासस्थानी आहेत.आजारी असल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर बोलताना सांगितले तर त्यांना घश्याचा त्रास असल्याने बोलताना त्रास होतो तंटे आजारी आहेत अशी माहिती अण्णा व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलीअसली , तरी त्यांच्या अनुपस्थितीवरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.

सत्तेत सहभागी होण्या अगोदर अजित पवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.दोन महिन्यांपूर्वी अचानक त्यांनी सत्तेत येण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी कॉग्रेसचा मोठा गट अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाला. याची कल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्हती. त्यामुळे सुरुवातीलाच शिंदे गटाच्या नेत्यांकडून अजित पवार यांच्या बाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर अशा काही घडामोडी अशा घडल्या की,अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात नाराजी वाढत गेली याच नाराजीमुळे अजित पवार गणेशोत्सव काळात मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले नाहीत.तसेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजेरी लावली अशी चर्चा आहे.अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले नाहीत.

गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री उशिरा पर्यंत एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. राज्यातील या तीनही बड्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली. यामध्ये विविध महत्वाच्या विषयावर चर्चा झाली होती. त्यानंतरही अजित पवार हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीत. अजित पवार कोणत्याही प्रशासकीय बैठका टाळत नाहीत असे असताना ते आजच्या महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *