Breaking News

भाजपा खासदाराची मुक्ताफळे, लोकसभेतच बसपाच्या मुस्लिम खासदाराविरोधात निंदनीय वक्तव्ये आंतकवादी, कटवे, भडवे शब्दाचा वापर

दक्षिण दिल्लीतील आणखी एका भाजपा खासदारांकडून भरलोकसभेत संसदेचे विशेष अधिवेशनात बसपा खासदाराच्या विरोधात अंत्यत निंदनीय शब्दांचा वापर केला. तसेच संबधित खासदाराचा नामोल्लेखक केला. परंतु संबधित भाजपा खासदाराला थांबविण्याचे काम पीठासीन अधिकाऱ्याने केले नसल्याची माहिती पुढ आली आहे. विशेष म्हणजे तृणमुल काँग्रेसच्या खासदार मोईना मित्रा यांच्यासह अनेक पक्षाच्या नेत्यांनी तो व्हिडिओ शेअर करत हीच का भाजपाची संस्कृती असा सवाल केला.

लोकसभेत आज दुपारच्या सत्रात चंद्रयान-३ या मोहिमेच इस्त्रोने मिळविलेल्या यशाबद्दल चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी दक्षिण दिल्लीतील भाजपाचे खासदार रमेश बिधुरी हे बोलायला उभे राहिले. त्यावेळी त्यांनी बसपाचे खासदार दानिश अली यांचे नाव घेत त्यांची भर लोकसभेतच अंत्यत निंदनीय शब्दाचा वापर करत मुस्लिम समाज आणि खासदाराच्या विरोधात एकप्रकारे भाजपा संस्कृतीचे जाहिर प्रदर्शन केले.

यावेळी भाषणात भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याकडे पहात अभद्र भाषेचा वापर सुरु केला. यावेळी रमेश बिधुरी म्हणाले, इस्त्रोने जे यश मिळविले ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पण खरे श्रेय हे आंतकवादी, उग्रवादी (असे सांगत दानिश अली यांना उद्देशुन) घेत असल्याचा कांगावा केला.

तसेच रमेश बिधुरी म्हणाले, ये जो दानिश अली है वो कटुआ है, भडवा है असा निंदनीय आणि अभद्र शब्दांचा वापर केला. त्याबरोबर तु बाहर चल देखता हॅु सारखे धमकी देणारे शब्दही वापरले. त्यावेळी सदनाचे पीठासीन अधिकारी कोडीकुन्नील सुरेश होते. त्यांनी काही वेळा भाजपा खासदार रमेश बिधुरी आणि दानिश अली यांना शांत बसण्याची सूचना केली. पण भाजपा खासदार रमेश बिधुरी हे काही कोणाचे ऐकण्याच्या मनस्थित नव्हते.

या प्रकरणानंतर तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी सदर व्हिडिओ ट्विट करत म्हणाल्या की, ही भाजपाची संस्कृती असून मुस्लिम आणि ओबीसी समाजावर दोषारोप आणि त्यांचे शोषण करणे हा त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. त्याचे त्यांना काहीच वाटत नाही. भाजपाच्या या संस्कृतीमुळे देशभरातील प्रत्येक राज्यात राहणारा मुस्लिम समाजाला त्यांच्या देशात आणि मातृभूमीत घाबरून रहावे लागत आहे.

दरम्यान, दिल्ली महानगरपालिका निवडणूक काळात दिल्लीतीलच भाजपाच्या एका खासदाराने मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत गोळ्या घालून मारण्याचे आवाहन भर सभेत केले. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात फटकारल्यानंतर अखेर त्या खासदाराला माफीनामा द्यावा लागला होता.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

शरद पवार यांनी घेतला पटेल यांचा समाचार, मलाही उत्सुकता आहे पण ते ईडीचे…

कर्जत येथील अजित पवार गटाच्या मंथन शिबीरात बोलताना शरद पवार यांच्या नेतृत्वावर अजित पवार यांच्यासह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *