Breaking News

आयडीबीआय बँकेने अमृत महोत्सव एफडीची मुदत वाढवली ३१ ऑक्टोंबर पर्यंत मुदतीचा कालावधी वाढविला

आयडीबीआय बँकेने अमृत महोत्सव एफडीमधील गुंतवणुकीची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. बँकेच्या या योजनेत गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळेल.

आयडीबीआय बँक ४४४ दिवसांच्या अमृत महोत्सव एफडी योजनेत ७.१५ टक्के व्याज दर देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना ७.६५ टक्के दराने व्याज मिळत आहे. या एफडीतून मुदतीपूर्वी गुंतवणूककाढण्याची आणि बंद करण्याची परवानगी आहे.

आयडीबीआय बँक ३७५ दिवसांसाठी अमृत महोत्सव एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ७.६५ टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी नियमित ग्राहक, NRI आणि NRO ग्राहकांना ३७५ दिवसांच्या एफडीवर ७.१० टक्के व्याज देत आहे. यात वेळेपूर्वी पैसे काढणे किंवा बंद करण्याचा पर्यायही दिला जातो.

सध्या आयडीबीआय बँक ७ दिवस ते पाच वर्षात परिपक्व होणाऱ्या एफडीमध्ये गुंतवणुकीची संधी देते. बँक या एफडीवर ३ टक्के ते ६.५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. बँक सात दिवस ते पाच वर्षात परिपक्व होणाऱ्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ३.५ टक्के ते ७ टक्के व्याज देत आहे.

दरम्यान, अ‍ॅक्सिस बँकेने एफडीवरील व्याजदर ०.५० टक्क्यांनी कमी केले आहे. ही कपात ठराविक कालावधीच्या एफडीवर करण्यात आली आहे. नवीन व्याजदर १५ सप्टेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत. बँक सध्या आपल्या ग्राहकांना ३.४ टक्के ते ७.१० टक्के व्याज देत आहे. बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत एफडीमध्ये गुंतवणुकीची संधी देते. अ‍ॅक्सिस बँक २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर हे व्याज देत आहे.

Check Also

पेटीएम, IIFL बँक आणि आता कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयची बंधन एकदम तीन बँकावर लादलेली बंधन सारखीच

भारताच्या आर्थिक परिस्थितीत, स्थिरता राखण्यात आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नियामक निरीक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *