Breaking News

काँग्रेसची दुसरी ४३ जणांची लोकसभा उमेदवारांची यादी जाहिर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी ४३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत कमलनाथ आणि अशोक गेहलोत यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या मुलांची नावे आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ यांना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. ते या जागेवरून विद्यमान खासदार आहेत.

वैभव गेहलोत हे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा आहे. त्यांना राजस्थानमधील जालोरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा मुलगा गौरव गोगोई यांना जोरहाटमधून उमेदवारी देण्यात आली आहे. गोगोई हे कालियाबोर मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत.

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत आसाममधून १२, गुजरातमधून ७, मध्य प्रदेशातील १०, राजस्थानमधील १० आणि दमण आणि दीवमधून १ उमेदवार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या मते, यादीतील ७६.७ टक्के उमेदवार अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आहेत.

जोधपूरमधून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या वैभव गेहलोत यांनी आपला मतदारसंघ बदलत जालोर हा वडिलांचा मतदारसंघ निवडला आहे. या मतदारसंघात अशोक गेहलोत यांचा वरचष्मा आहे.

दरम्यान, सोमवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) बैठकीला जाणे अशोक गेहलोत यांनी टाळले. या बैठकीत गेहलोत यांनी निवडणूक न लढवण्याचा मुद्दा उपस्थित केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. केसी वेणुगोपाल यांनी विचारले की, दुसरे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल उडी घेत असताना गेहलोत निवडणूक लढवण्यास का इच्छुक नव्हते. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने गेहलोत यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत जोधपूरमधून निवडणूक न लढवल्याचे सांगितले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *