Breaking News

बाळासाहेब थोरात म्हणाले, लोकशाही राहील की नाही अशी परिस्थिती… पंतप्रधान मोदींच्या ‘घर घर तिरंगा’ला काँग्रेसकडून ‘स्वातंत्र्याचा गौरव’ यात्रेचे उत्तर

मागील काही दिवसांपासून बंद करण्यात आलेली नॅशनल हेराल्ड केस पुन्हा नव्याने ओपन करून ईडीकडून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त घर घर तिरंगा अभियानाची घोषणा केली. या अभियानाला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसकडून स्वातंत्र्यांचा गौरव यात्रेचे आयोजन केले असून ही यात्रा ९ ते १५ ऑगस्ट या काळात प्रत्येक जिल्ह्यातून काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.

युपीएच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची कामे झाली. यामध्ये महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी म्हणजे रोजगार हमी कायदा, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, भूसंपादन यासारख्या अनेक महत्त्वाचे कायदे मनमोहन सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली या देशात लागू करण्यात आले. मात्र, आता काळ बदललेला आहे. देशात एक प्रकारची दहशत सुरू आहे. विरोधकांचं आवाज बंद करण्याचे काम सुरू आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंवर कर लावण्यात आला आहे. देशात लोकशाही राहील की नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जनतेला परिस्थितीची जाणीव करून देणं ही काँग्रेसची जबाबदारी आहे. यासाठी काँग्रेसतर्फे ‘स्वातंत्र्याचा गौरव’ ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात निघाणार असल्याचंही त्यांनी सांगितले. म्हणाले.
१९४२ च्या चळवळीत शिरीष कुमार यांचं हुत्मामं सर्वांच्या स्मरणात राहणारं आहे. इंग्रजांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. यानिमित्त नंदुरबारमध्ये पदयात्रे दरम्यान मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील फैसपूर येथे १९३६ साली काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. देशातले सर्व काँग्रेसचे नेते त्यावेळी तिथे आले होते. या ठिकाणीही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच नगर जिल्ह्यातील भुईकोट इथे पंडित नेहरूंना तीन वर्ष कारावास झाला होता. त्यांनी इथेच डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ इथेच लिहीला होता. त्यामुळे या ठिकाणी आम्ही गौरव यात्रेचा समारोप करणार असल्याचे ते म्हणाले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *