Breaking News

जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती निवडणूकीत मार्गारेट अल्वा यांना १८२ मते

पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे आणि एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखड यांची भारताचे १६ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. उपराष्ट्रपती पदासाठी आज झालेल्या निवडणूकीत त्यांनी युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. ७२५ मतांपैकी धनखड यांना ५२८ तर अल्वा यांना १८२ मतं पडली. तसेच १५ मतं अवैध ठरली असल्याची माहिती संसदेच्या सचिवांनी दिली.

जगदीप धनखड ११ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील. राष्ट्रपती निवडणूकी पाठोपाठ उपराष्ट्रपती पदासाठीही निवडणूक घेण्याची प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरु केली. त्यानुसार आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. उपराष्ट्रपती पदासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे खासदारांना मतदानाचा अधिकार होता. तो अधिकार त्यांनी बजावला.

विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळे भारताचे १६ वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांची निवड झाली आहे. जनता दल (युनायटेड), वायएसआरसीपी, बसपा, एआयएडीएमके यांसारख्या प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने धनखड यांचा विजय निश्चित मानला जात होता. तर अल्वा यांना आम आदमी पार्टी (आप), झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) यांचा पाठिंबा मिळाला. काँग्रेसनंतरचा दुसरा सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसचा (टीएमसी) पाठिंबा मिळवण्यात अल्वा यांना अपयश आले होते. त्यामुळे त्यांना कमी मते मिळाली. अल्वा यांना १८२ तर धनखड यांना ५२८ मते मिळाली.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *