Breaking News

मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन, अंगणवाडी सेविकांच्या या मागण्या मान्य आश्वासनानंतर अंगणवाडी सेविका संघटनेकडून आंदोलन मागे

राज्यातील अंगणवाडी सेविकांना मानधनात १५०० रुपये वाढ तसेच अंगणवाडी सेविकांसाठी पेन्शन योजना तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. विधानभवनात अंगणवाडी सेविकांच्या संघटनेबरोबर मुख्यमंत्र्यांची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले आहे.

मानधन वाढ, पेन्शन योजना लागू करावी यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांसह मदतनीस २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला होता. अंगणवाड्या बंद करून सेविका आणि मदतनी या संपात सहभागी झाल्या होत्या. या संपाचा फटका राज्यातील लाखो बालकांना बसत होता. अंगणवाडी बंद असल्याने सहा वर्षापर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत होते. सोबतच गर्भवती मातांची तपासणी, बालकांचे लसीकरण, कुपोषण निर्मुलन आदी कार्यक्रमांवरही मोठा परिणाम होत होता. ही बाब लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलवले होते. या बैठकीत मानधनवाढीसह पेन्शन योजना आणि इतर मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. मानधन वाढवण्याबरोबर अंगणवाडी सेविकांसाठी १५ दिवसात पेन्शन योजना तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहे.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील म्हणाले, अनेक अंगणवाडी सेविकांचे वय ५० वर्षांच्या वर गेलेले आहे. त्यांना वृद्धपकाळाची काळजी आहे. आम्हाला अपेक्षेप्रमाणे पेन्शन योजना तयार झाली तर तो वृद्धवपकाळासाठी आधार ठरेल. मानधनवाढ आणि पेन्शन योजनेबाबत दिलेल्या आश्वासनांचा विचार करून आम्ही संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *