Breaking News

Tag Archives: strike

मुख्यमंत्री शिंदे संपकऱ्यांना आवाहन करत म्हणाले, समितीचा अहवाल आल्यानंतर पेन्शनचा निर्णय विधानसभेत संध्याकाळी आवाहन केल्यानंतर

राज्यातील १८ लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी संपाचे हत्यार उपसले आहे. यात जुनी पेन्शन योजना लागू करावी ही प्रमुख मागणी आहे. संपकरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत तर दुसरीकडे सरकार आम्ही त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहोत असे सांगत आहे. संपकऱ्यानी आपला संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केले …

Read More »

नाना पटोलेंची टीका, उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा पण शेतकरी, कर्मचाऱ्यांसाठी नाही जुनी पेन्शन प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढा अन्यथा खुर्ची खाली करा

भारतीय जनता पक्षाचे सरकार कोणत्याही मुद्द्यांवर केवळ सकारात्मक आहे असे म्हणून वेळ मारून नेते पण ठोस निर्णय घेत नाही. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी २० लाख कर्मचारी संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन लागू केल्यास आर्थिक बोजा पडेल असे सांगणाऱ्या सरकारकडे मुठभर उद्योगपतींची कोट्यवधींची कर्ज माफ करण्यासाठी पैसा आहे …

Read More »

संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा इशारा शिस्तभंगाची कारवाई करणार- सचिव सुमंत भांगे

१४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. राज्य शासकीय कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी १४ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन, अंगणवाडी सेविकांच्या या मागण्या मान्य आश्वासनानंतर अंगणवाडी सेविका संघटनेकडून आंदोलन मागे

राज्यातील अंगणवाडी सेविकांना मानधनात १५०० रुपये वाढ तसेच अंगणवाडी सेविकांसाठी पेन्शन योजना तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. विधानभवनात अंगणवाडी सेविकांच्या संघटनेबरोबर मुख्यमंत्र्यांची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले आहे. मानधन वाढ, पेन्शन योजना लागू करावी यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांसह मदतनीस …

Read More »

जनता निषेधात तर दलित केंद्रीय मंत्री आत्मचरित्र पुस्तक प्रकाशनात मग्न दलित संघटनांच्या महाराष्ट्र बंदकडे दस्तुरखुद्द केंद्रीय राज्यमंत्री आठवलेंची पाठ

मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगांव येथे मानवंदना देण्यासाठी गेलेल्या दलित समाजावर काही समाजकंटकानी दगडफेक केली. त्या निषेधार्थ राज्यातील सर्व दलित संघटना, डाव्या पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला. मात्र दलित समाजातीलच असलेले आणि स्वत:ला दलितांचा नेता म्हणवून घेणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना आपल्या आत्म चरित्रात्मक …

Read More »

नागरिकांच्या पाठिंब्याने महाराष्ट्र बंदला शांततेत सुरुवात दलित कार्यकर्त्यांकडून वाहन चालक आणि नागरीकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी भीमा कोरेगांव येथील समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध दलित संघटना आणि डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद हाकेला राज्यातील बहुतांष ठिकाणी स्थानिक नागरिकांनी ओ देत दैनंदिन कामकाजावर थांबविण्यास सुरुवात केली आहे. या बंद मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, विरार, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अनेक शाळा आणि एस.टी,बसेस बंद ठेवण्यात …

Read More »