Breaking News

लोकसभेत खासदाराने केलेल्या निंदनीय वक्तव्यावर भाजपाने उचललं पाऊल कारणे दाखवा नोटीस बजावली

काही दिवसांपूर्वी देशातील महत्वपूर्ण असलेल्या चंद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वी चाचणीनंतर इस्त्रोचे अभिनंदन करण्याच्या प्रस्तावावरील चर्चेवेळी भाजपाचे दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बुधारी यांनी भर संसदेतच बसपाचे मुस्लिम खासदार दानिश अली यांना लक्ष्य करत हेट स्पिचचा वापर करत अशलाघ्य भाषेचा वापर केला.

सध्या देशात राजकिय निवडणूकांचे वातावरण चांगलेच तापलेले आहे. मात्र भर लोकसभेत मुस्लिम खासदाराच्या विरोधात अशा स्वरूपाची भाषा वापरल्याचा व्हिडीओ विरोधकांकडून चांगलाच व्हायरल केला. त्यामुळे अखेर याप्रकऱणी उशीराने का होईना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कारणे दाखविली असल्याची माहिती पुढे येत आहे.

वास्तविक पाहता भाजपा खासदार रमेश बुधारी यांनी बसपाचे खासदार दानिश अली यांचे नाव घेत मौलाना देशद्रोही, आंतकवादी, भडवा, कटवा सारख्या निंदनीय शब्दांचा वापर करत एकप्रकारे लोकशाहीच्या मंदिरात द्वेषमुलक असलेले भाषण केले. त्यामुळे विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे.

हेही वाचाः  भाजपा खासदाराची मुक्ताफळे, लोकसभेतच बसपाच्या मुस्लिम खासदाराविरोधात निंदनीय वक्तव्ये

यापार्श्वभूमीवर एका वृत्त संस्थने खासदार रमेश बुधारी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भाजपाकडून कोणत्याही स्वरूपाची अधिकृत कारवाईची माहिती देण्यात आली नाही.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

Telangana Election : मतदारांना उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन, जाणून घ्या, कोणत्या जागा विशेष !

Telangana Election : ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभेसाठी गुरुवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *