Breaking News

अखेर शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, आधी ना ना, नंतर हा हा पंतप्रधान मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा आणि अमित शाह यांच्या आवाहनानंतर फडणवीसांचा निर्णय

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला भाजपाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचा निर्णय भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केला. तसेच या सरकारमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचेही स्पष्ट केले. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनी फोन करून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचे आवाहन केले. तरीही फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास तयार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून सांगितल्यानंतर अखेर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास तयार असल्याचे अमित शाह यांनी ट्विट करत जाहिर केले.

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी करण्यासाठी आणि शिवसेनेला चोख बंदोबस्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मागील १० दिवसांपासून बरेच प्रयत्न केले. तरीही महाराष्ट्रातील सध्याची आणि भविष्यकाळातील राजकिय परिस्थितीवर मात करण्यासाठी म्हणून फडणवीस यांनी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्याची रणनीतीही यशस्वी करून दाखविली. मात्र या सरकारमध्ये स्वत: सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने केंद्रीय नेत्यांना याबाबत धक्का बसला. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना फोन केला. त्यानंतर फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठीना कळविले. त्यानुसार अमित शाह यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास तयार असल्याचे जाहिर केले.

देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास सांगितल्याने त्यांचे भाजपामध्ये एकप्रकारे खच्चीकरण सुरु झाल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे. तसेच फडणवीस यांच्याकडे वित्त आणि गृह ही खातील राहणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग आणि अन्य एक खाते राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *