Breaking News

भारिप व भाजपाच्या या २३ नगरसेवक व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला

मराठी ई-बातम्या टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम, मावळ आणि ठाणे ग्रामीण भागातील भारिप, भाजपच्या अनेक नेत्यांनी व नगरसेवकांनी आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार सुनील शेळके, आमदार डॉ. किरण लहामटे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, प्रदेश सरचिटणीस नसिम सिद्दीकी तसेच पक्षाचे इतर स्थानिक पदाधिकारी व कायकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आदरणीय पवारसाहेबांचे कुटुंब आहे. या‌‌ कुटुंबात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपले प्रश्न इथे नक्कीच‌ सुटतील. कार्यकर्त्यांची गुज राखणारा हा पक्ष आहे. काही दिवसांनी राष्ट्रवादीची सदस्य नोंदणी सुरु होणार आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून पक्षनोंदणीचा कार्यक्रम जोरात राबवा असे आवाहन केले.
अजितदादा पवार यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना नवीन सदस्यांचे पक्षात स्वागत केले व पक्ष बळकटीसाठी सर्वांना एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आदरणीय पवारसाहेबांनी स्वाभिमानातून स्थापन केलेल्या पक्षाची विचारधारा सामान्य जनतेपुढे पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आजचा पक्षप्रवेश प्रभावी ठरेल, असा विश्वासही अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.
प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव व नगरसेवक व ठाणे महानगरपालिकेचे गटनेते नजीब मुल्ला यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, गुंदवळी उपसरपंच विलास पाटील, भिवंडी शिवसेना विभाग अध्यक्ष भालचंद्र भोईर, राहनाळ उपसरपंच किरण नाईक यांनी पक्षात प्रवेश केला.
यासोबतच मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने लोणावळ्याचे विद्यमान नगरसेवक भरत हरपुडे, आरोही तळेगावकर, तळेगाव माजी उपनगराध्यक्ष चंद्रभान खळदे, उपसरपंच स्वप्निल काळोखे, उद्योजक भरतशेठ काळोखे यांनीही हाती घड्याळ बांधले.
हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्यासह हेमेंद्र ठाकरे, जुम्मा पप्पुवाले, फिरोज शेकुवाले, चांदशा कासमशा, अ.एजाज अ. मन्नान, जावेदोद्दीन शेख, इरफानखान इनायतुल्लाखान, जाकीर शेख मोहम्मद इसहाक, सलीम प्यारेवाले, राजू इंगोले, सलीम शेख लालू गारवे, अहमद रशीद अ. कादीर, जाकीर अली अब्बासअली, अ.आरीफ अ.वारिस मौलाना, सै. मुजाहीद सै. अजीज, निसारखान नजीरखान डॉ. धनंजय राठोड, मो. फैजल नागानी, संतोष भोयर, गोपाल खोडके, मो. सोहेल अंसारी, अ. बशीर रहीम, शेषराव राठोड या भारिपमधील २३ नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश झाला.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *