Breaking News

गुजरात निवडणूकः भाजपा ९५ जागांवर विजयी तर ६१ ठिकाणी आघाडीवर काँग्रेस ७ ठिकाणी विजयी तर ९ ठिकाणी आघाडीवर, आप २ ठिकाणी विजयी तर २ ठिकाणी आघाडीवर

मोरबी दुर्घटनेनंतर गुजरातमध्ये लगेच विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या. त्यामुळे या घटनेचा प्रभाव निवडणूकांवर काय पडणार याची उत्सुकता लागून राहिली होती. तसेच मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झीट पोलमध्ये गुजरातमध्ये भाजपाला १३० ते १५० विधानसभेच्या जागा मिळणार असल्याचे भाकित करण्यात आले. त्यामुळे एक्झीट पोलमध्ये वर्तविण्यात आल्याप्रमाणे भाजपाला जागा मिळणार की नाही अशी चर्चा सुरु असतानाच आज मतमोजणी दरम्यान भाजपाला ९५ ठिकाणी विजय मिळाला असून ६१ ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तर काँग्रेसला ७ ठिकाणी विजय मिळाला असून १० ठिकाणी आघाडीवर आहे. मात्र या निवडणूकीत ज्या आपची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगली होती. त्या आम आदमी पार्टीला ३ जागा मिळाल्या असून आणखी दोन ठिकाणी आघाडीवर असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दाखविण्यात येत आहे. त्यामुळे भाजपाने चवथ्यांदा गुजरातमधील सत्ता राखण्यात यश मिळविले.

मोरबी दुर्घटनेत १४३ जणांचा बळी गेला. यादुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर निवडणूका होत असल्याने या दुर्घटनेमुळे जनमानस मोठ्याप्रमाणावर भाजपाच्या विरोधात जाईल असे बोलले जात होते. मात्र मोरबी दुर्घटनेनंतरही गुजरातच्या जनतेमध्ये भाजपाविषयी नाराजी नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच आतापर्यंत भाजपाने आघाडी घेतलेल्या मतदारसंघाचा विचार केल्यास भाजपा चौवथ्यांदा गुजरातमध्ये सत्ता स्थापना असल्याचे स्पष्ट झाले.

काँग्रेसला गतवेळी चांगल्या जागा मिळाल्या होत्या. मात्र राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेमुळे गुजरातच्या प्रचाराला राहुल गांधी यांना फारसे गुजरातमध्ये जाता आले नाही. तर दुसऱ्याबाजूला मल्लिकार्जून खर्गे यांच्या तीन सभा गुजरातमध्ये झाल्या. तसेच प्रियंका गांधी वड्रा यांची एक सभा झाली. त्यामुळे काँग्रेसला आतापर्यंत ७ ठिकाणी विजय मिळविता आला आहे. तर ९ ठिकाणी आघाडीवर असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

तर गुजरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी आणि भाजपामध्ये चांगलीच लढत सुरु झाली होती. त्यामुळे आम आदमी पार्टी काँग्रेसची जागा घेणार का? अशी चर्चा सुरु झाली. मात्र आज निवडणूक निकालात आम आदमी पार्टीने आपले खाते उघडत २ जागी विजय मिळविला तर २ जागी आघाडीवर असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे.

Check Also

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *