Breaking News

काँग्रेस नेते वेणुगोपाल ठाकरे यांना भेटल्यावर म्हणाले, आम्ही उध्दव ठाकरेंच्या सोबत…भेटीचे निमंत्रण संयुक्त पत्रकार परिषदेत दिली चर्चेची माहिती

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज मातोश्री येथे जाऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वेणुगोपाल यांनी माध्यमाशी बातचित केली. वेणुगोपाल म्हणाले की, उद्धव ठाकरे हुकूमशाहीविरोधात लढत आहेत आणि या लढाईत काँग्रेस त्यांच्यासोबत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा हाच निरोप घेऊन मी इथे आलो आहे.

के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचा निरोप घेऊन मी इथे आलो आहे. देशातली आणि महाराष्ट्रातली जी राजकीय परिस्थिती आहे. देशात लोकशाहीची पायमल्ली होत असताना आपण पाहतोय. लोकशाहीविरोधी ताकदींशी उद्धव ठाकरे लढत आहेत. देशातले सत्ताधारी लोक सर्वच विरोधकांना लक्ष्य करत आहेत. त्यात शिवसेनेला सर्वाधिक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु या काळत काँग्रेस शिवसेनेसोबत आहे. आम्ही उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आहोत.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते वेणुगोपाल म्हणाले की, विरोधकांची मोट बांधण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही पाहिलंच असेल राहुल गांधी नुकतेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना भेटले. त्यानंतर ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटले. हुकूमशाहीवाल्या मोदी सरकारविरोधात लढण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हाच या भेटीमागचा मुख्य उद्देश आहे.

माध्यमांच्या प्रतिनिधींनी वेणुगोपाल यांना प्रश्न विचारला की, काँग्रेस नेते राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट कधी घेणार? त्यावर वेणुगोपाल म्हणाले की, “मी आणि उद्धवजींनी नुकतीच बातचित केली. मीच उद्धवजींना आत्ता विनंती केली आहे की, उद्धवजींनी दिल्लीत येऊन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घ्यावी. सोनिया गांधींच्या प्रकृतीबाबत सर्वांना माहितीच आहे. उद्धवजी दिल्लीत येऊन राहुल आणि सोनिया गांधींना भेटल्यानंतर नक्कीच राहुल गांधी देखील मुबईत येऊन उद्धव ठाकरेंना भेटतील.

तर उध्दव ठाकरे म्हणाले, आजचा भेटीचा उद्देश वेणूगोपालजींनी स्पष्ट केला. सर्वांचे मातोश्रीवर स्वागत. देशात मी करणाच्या विरोधात एक समीकरण. म्हणून सर्व पक्ष एकत्र प्रत्येक पक्षाचे स्वतः ची विचारधारा आहेच. त्यालाच लोकशाही म्हणतात म्हणून आम्ही एकत्र आलोय. निवडणुका समोरच उभ्या आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. मागे भाजपचे अध्यक्ष नड्डा बोललेले फक्त भाजपा राहील इतर सगळे पक्ष संपतील. शिवसेना संपवावी यासाठी भाजपाचे प्रयत्न. भाजपला सत्तेचा हव्यास सत्ताभक्षक झाले आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरली आहे. वेणूगोपालजी यांचे आणि काँग्रेसचे आभार. आपली चर्चा होतच असते. आम्ही मैत्री करतो तर पूर्ण मनापासून निभवतो एक नाते निर्माण होतो. भाजपा सोबत २५-३० वर्ष होतो. पण होतो पण त्यांना किंमत नव्हती पण ठिक आहे. त्यांना मित्र आणि शत्रू समजले नाहीत. लोकांच्या मनात प्रश्न आहेत ते आपल्याला साथ देतील.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *