Breaking News

मलिक यांच्या त्या गौप्यस्फोटावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, ते भाजपाच्या विचारांचे… पुलवामा प्रकरणावेळी ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, मलिकांच्या या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, काश्मीरमधील पुलवामा येथे आपल्या ४० जवानांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. ते भाजपाच्या विचाराचे होते. भाजपानेच त्यांनी नियुक्त केली होती. आता राज्यपालपदाची मुदत संपल्यानंतर त्यांनी खरी परिस्थिती सांगितली. आपल्या सैन्याला एअरक्राफ्ट आणि आवश्यक ती साधनं वेळेवर न दिल्याने ही घटना घडली. तसेच पंतप्रधांनी त्यांना या विषयावर शांत राहायला सांगितल्यांचही, ते म्हणाले. ही सत्य परिस्थिती होती, अशी प्रतिक्रिया दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड इथे आयोजित शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधला. या शेतकरी मेळाव्याला अचानकपणे येण्याची संधी मला मिळाली. हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे. संपूर्ण देशात कोणता वर्ग अस्वस्थ आहे हा प्रश्न विचारला तर अनेक लोक पुढे येतात. पण देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम आज कशामुळे होतोय आणि देशात आत्महत्येसारख्या संकटामध्ये कोणता वर्ग आहे पाहिले तर शेतकऱ्यांचा विचार पुढे येतो. शेतकरी आज अडचणीत आहे.

तसेच शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, आपल्या सैनिकांचं रक्षण करण्याची जबाबदारी केंद्रातील भाजपा सरकारवर आहे. मात्र, सरकार ही जबाबदारी घ्यायला तयार नसेल, तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका ही केली.

पुरंदर तालुक्यातील सासवड इथे आयोजित शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधला. या शेतकरी मेळाव्याला अचानकपणे येण्याची संधी मला मिळाली. हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे. संपूर्ण देशात कोणता वर्ग अस्वस्थ आहे हा प्रश्न विचारला तर अनेक लोक पुढे येतात. पण देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम आज कशामुळे होतोय आणि देशात आत्महत्येसारख्या संकटामध्ये कोणता वर्ग आहे पाहिले तर शेतकऱ्यांचा विचार पुढे येतो. शेतकरी आज अडचणीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातही गारपिटीने, पावसाने टोमॅटो, द्राक्ष, कांद्यासारखी अनेक पीकं शेतकऱ्यांच्या हातून गेली. विदर्भात सोयाबीन आणि कापसाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. याचे पंचनामे झाल्याचे सरकारने सांगितले, तरीही तिथे अजूनही मदतीचा पत्ता नाही. अशा संकटग्रस्तांना मदत नाही असेही ते म्हणाले.

त्याशिवाय महागाई, बेकारीचे संकट आहे. तसेच अनेक गोष्टी देशात घडल्या तरी खऱ्या अर्थाने त्यांची वस्तूस्थिती देशासमोर मांडली गेलेली नाही. मध्यंतरी पुलवामा भागात चाळीस जवान शहीद झाले. यामागची गोष्ट जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी समोर आणली. मलिक यांची राज्यपालपदी नियुक्ती भाजपकडून करण्यात आली होती. त्यावेळी जवानांना आवश्यक साधने, विमाने वेळीच पुरवली गेली नसल्याने त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. मलिक यांनी देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीच्या हे कानावर घातले तेव्हा याबाबत कुठे बोलू नये, असे सांगण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

देशाच्या जवानांचे रक्षण करण्याची जबाबदारी देशाच्या सरकारवर आहे. ती सुद्धा पार पाडायची नाही अशी भूमिका जे सरकार घेते त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. त्यासाठी पुढील निवडणूक महत्त्वाची ठरणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *