जमिन व्यवहाराची माहिती नाही म्हणणारे अजित पवार संध्याकाळ होताच म्हणाले, व्यवहार रद्द पार्थ पवार याच्या महार वतन जमिन खरेदी प्रकरणी अजित पवार यांची आता सारवासारव

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी महार वतनाची जमिन खरेदी केली. त्यामुळे अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ चांगलेच अडचणीत आले. तसेच प्रकरण बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याची घोषणा करत तथ्य असेल तर कारवाई करणार असल्याचे जाहिर केले. त्यानंतर वेगाने चक्र फिरली. काल या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी बोलत असताना या प्रकरणाशी दुरान्वये संबध नसल्याचे सांगत नियम आणि कायद्याच्या चौकटीबाहेरच्या कोणत्याही कामाला आपण पाठिंबा देत नाही अशी भूमिका मांडत सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला.

तसेच यासंदर्भात सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा याप्रकरणी बोलताना म्हणाले की, या व्यवहाराची मला अजितबात माहिती नाही. माहिती असते तर मला विचारून व्यवहार झाला असल्याचे मी बोललो असतो. माझ्या नातेवाईकांनी किंवा जवळच्या व्यक्तींनी व्यवहार केला असता तर मी त्यांना नियमाला धरून व्यवहार केला तर नियमाला धरून व्यवहार करा असे सांगत असतो. सदर प्रकरण बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांन नागपूरला असताना भाष्य केले होते. त्यांच्याशी फोनवर बोलताना मी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते की, तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. कारण आरोप करणे सोपे असते.पण वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक असते असेही सांगितले.

तसेच अजित पवार पुढे म्हणाले की, या प्रकरणात विरोधकांनी मोठ मोठे आकडे दिले गेले. पण एक रुपयाचाही व्यवहार झालेला नाही. विरोधकांनीही मोठ-मोठे आरोप केले. पण मला आता संध्याकाळी मिळालेल्या माहितीनुसार जो व्यवहार झाला होता, तो रद्द करण्यात करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे अजित पवार म्हणाले की, जमिनीची जी नोंदणी केली होती, ती नोंदणी रद्द करण्यात आल्याची माहिती आता मिळाली आहे. नोंदणी कार्यालयात नोंदणी केलेले कागदपत्रे रद्द करण्यात आली आहेत. सदर जमिन सरकारी आहे. त्यामुळे त्याचा व्यवहारच होवू शकत नाही. जमीन पूर्वीची महार वतनाची जमीन आहे. त्यामुळेच अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी केली जाईल असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

चंद्रकांत पाटील यांची माहिती, उच्च शिक्षण विभागांतर्गत मुंबईतील कार्यालये एकाच ठिकाणी होणार चेंबूर येथील उच्च शिक्षण विभागाच्या इमारत बांधकामास गती द्यावी

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली काही महत्वाची कार्यालय आणि विभागीय कार्यालय मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *