Breaking News

‘दादा – बाबा’चा एकाच गाडीतून प्रवास… राजकिय विरोधक असूनही एकाच गाडीतून प्रवास

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार क्वचितच एकत्र दिसतात. त्यातच पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील सिंचनाची श्वेतपत्रिका काढत त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांची चांगलीच अडचण केली. त्यामुळे त्यांच्यात चांगलेच राजकिय शत्रुत्व निर्माण झाले होते. मात्र अजितदादा आणि पृथ्वीराज बाबा यांनी आज चक्क एकत्रित प्रवास केला. अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी एकाच गाडीत थेट विधानभवन ते आझाद मैदान असा प्रवास केल्याने विधानभवन ते आझाद मैदान परिसरात अनेकांच्या भुवया उंचावल्या.  या प्रवासात अजितदादा फ्रंट सीटवर बसले होते तर पृथ्वीराज बाबा बॅक सीटवर बसल्याचे दिसत होते.

घडलं असं की…

अण्णाभाऊ साठे यांचे वारसदार काही मागण्यांसाठी आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत. विरोधी पक्षनेते या नात्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते अण्णाभाऊ साठे यांच्या वारसदार भेट देणार होते. आझाद मैदानाकडे जाण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण ज्या गाडीत बसले होते. त्याच गाडीत अजितदादांची बसण्याची व्यवस्था केली होती. अजितदादा त्या गाडीत बसण्यास तयार नव्हते असे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते मात्र नाईलाजाने त्यांना त्याच गाडीत बसावे लागले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *