Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना…खालची वरची वागणूक देणार नाही अजित पवार यांना सगळे लोक दबंग म्हणतात

राज्यातील भाजपा प्रणित शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार यांनी पाठिंबा देत सहभागी झाले. त्यानंतर निर्माण झालेल्या खाते वाटपातील विरोधानंतरही अजित पवार यांच्याकडे अर्थखाते भाजपाने दिले. त्यांमुळे शिंदे गटाने विरोध केला, तसेच आधीप्रमाणेच ते निधीबाबत भेदभाव करतील, अशी शंका व्यक्त केली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या चर्चांवर भाष्य केलं. ते शनिवारी १५ जुलै रोजी नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवारांनी सांगितलं आहे की, त्यांना सगळे लोक दबंग म्हणतात. ते कडक असल्याचं बोलतात. ते रेटून नेतात, असं म्हणतात. मात्र, तसं नाही. ते सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आहेत. आमच्या तिन्ही पक्षाच्या आमदारांना सगळ्यांना बरोबर घेऊन जात कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेईन, असं अजित पवारांनी सांगितलं.

तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मीही सांगतो की, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्याबरोबरच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन आमच्याबरोबरच्या २०० पेक्षा अधिक आमदारांपैकी एकावरही अन्याय होऊ देणार नाही. कुणालाही खालची, वरची वागणूक देणार नाही. सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम हे सरकार करेल, अशी ग्वाही दिली.

पुढे मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले, विरोधी पक्ष वज्रमुठ करत होते. त्यांची वज्रमुठ तर वज्रझुठ ठरली. तसेच या देशाची मोट बांधायला निघालेल्यांची स्वतःचीच बोटं फुटून गेली. त्यांच्यात काहीच राहिलं नाही. त्यामुळे हे सगळे पंतप्रधान मोदींच्या विरोधात एकत्र आले, तरी एक नेता ठरवू शकत नाही. यातच मोदींचा विजय निश्चित झाला आहे. याआधीही २०१४, २१०९ मध्ये अनेक आरोप झाले, आघाड्या झाल्या, मात्र त्यांनी जेवढे आरोप केले तेवढ्या त्यांच्या जागा कमी झाल्या. २०१९ मध्ये तर विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी जेवढी संख्या लागते त्यापेक्षा खाली गेले, अशी टीका विरोधकांवर केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *