Breaking News

अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले, “कॉमेडी टीव्ही…” विकास कामावर भर महाराष्ट्राचे रोल मॉडेल इतर राज्यात पोहोचविणार

मराठी ई-बातम्या टीम

मुंबईतल्या वाहतूक कोंडीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घटस्फोटासाठी जबाबदार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पे़डणेकर आणि आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर एकच टीकेची झोड उठविली. त्यानंतर यासंदर्भात शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, कॉमेडीला टीव्हीवर राहू देत, आपण राजकिय काम आणि उदीष्टाला महत्त्व द्यायचं असे सांगत अप्रत्यक्ष अमृता फडणवीस यांना कॉमेडी म्हणून उपरोधिक टोला लागवला.

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जोगेश्वरी पूर्व येथील पुनम नगर महापालिका शाळेच्या बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मी शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य पार पाडत आहे. मुंबईचं मॉडेल आणि महाराष्ट्राचं मॉडेल इतर राज्यात पोहोचवणार असून त्या कॉमेडीला टीव्हीवर राहू देत, आपण राजकिय काम आणि उदीष्टाला महत्त्व द्यायचे असल्याचे सांगत मुख्यमंत्री आपले पहिल्या पाच मध्ये आलेले आहेत. मविआच्या कामाचं माँडेल इतर राज्यात पोहोचवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

निवडणूका सुरु होतील तेव्हा आपण त्यावर बोलू, आमचे प्रयत्न निवडणुकीसाठी हे नाही तर विकास कामांसाठी आहे. शिवसैनिकांना कुठल्या बास्केटमध्ये कुठला बॉल टाकायचा हे माहिती आहे. निवडणुकीला अद्याप वेळ आहे. चांगली काम होत असतात ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत. निवडणुकीच्या वेळेला विरोधकांना प्रचारात उत्तर देऊ असा इशाराही विरोधकांना त्यांनी यावेळी दिले.

शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य पार पाडत आहे. इतर राज्यात जिथे आम्ही लढत आहोत, तिथे प्रचाराला जात आहोत. इतर राज्यातही शिवसेनेची मागणी आहे. मुंबईचे मॉडेल काय? महाराष्ट्राचे मॉडेल काय आहे?  हे गेली दोन्ही वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टॉप फाईव्ह मधले मुख्यमंत्री बनून दाखवले आहे. देशभरात मुख्यमंत्र्यांची स्पर्धा असते हा नंबर मिळविण्याचे कठीण काम असते. हे महाराष्ट्राचं गव्हर्नन्स मॉडेल आम्ही देशासमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *