Breaking News

युपीत सध्या ५०-६० जागी निवडणूक लढवतोय पण लोकसभेला १०० जागांवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची लखनौत घोषणा

मराठी ई-बातम्या टीम

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले असताना आता येथील निवडणूकीच्या रिंगणात शिवसेनाही उतरत आहे. उत्तर प्रदेशातील सात टप्प्यातील निवडणूकीत ५० ते ६० उमेदवार उभे करत असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगत विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत ५०-६० उमेदवार ही अत्यंत लहान संख्या आहे. मात्र लोकसभेला महाराष्ट्राबाहेर १०० ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणूकीत शिवसेनेकडून लढविण्यात येत असलेल्या जागांची माहिती देण्यासाठी लखनौ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ही पवित्र भूमी आमची देखील आहे, जेवढी आपल्या सर्वांची आहे, देशाची आहे. तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छितो की, पाच राज्यात निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेश सर्वात महत्वपूर्ण राज्य आहे. इथली निवडणूक आणि इथले निकाल देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा काय असेल याचा निर्णय घेतात. यासाठी संपूर्ण देश उत्तर प्रदेशमध्ये काय घडतय? याकडे लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले.

मी इथे माझ्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेलो आहे. उत्तर प्रदेश खूप मोठे राज्य आहे. ४०० पेक्षाही जास्त सदस्य संख्या असलेली देशातील सर्वात मोठी विधानसभा इथे आहे. शिवेसेनेने यंदा ५० किंवा ६० उमेदवार मैदानात उतरवले आहेत. आतापर्यंत जेवढे टप्पे झाले त्यात आमचे जवळपास २० उमेदवार आहेत. येणाऱ्या पाच, सहा आणि सातव्या टप्प्यात ३० उमेदवार उभा राहतील. ४०० विधानसभा सदस्य संख्या असणाऱ्या या राज्यात ५०-६० उमेदवार ही काय फार मोठी संख्या नसल्याचेही स्पष्ट करत हे सर्व उमदेवार अतिशय गांभीर्यपूर्वक लढतील, पक्षाचा विस्तार करण्यासाठी आमचं हे पाऊल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमची कोणत्या मोठ्या पक्षाशी आघाडी झालेली नाही. हे खरं आहे परंतु, छोट्या पक्षांसह प्रत्येक भागात ज्यांची ताकद आहे त्यांच्यासोबत मिळून आम्ही निवडणूक लढवत आहोत. मात्र मी तुम्हाला यावेळी हे सांगू इच्छितो की, विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आम्ही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही १५ ते २० जागांवर लोकसभा निवडणुकी लढवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *