Breaking News

देशावरील ५४ लाख कोटीचे कर्ज १४० लाख कोटींवर वर्तमानातील सर्वाधिक कमकुवत पक्ष नरेंद्र मोदी आणि भाजपा-पत्रकार अशोक वानखेडेंचा दावा

देश स्वतंत्र झाल्यानंतर २०१४ पर्यंत देशावर ५४ लाख कोटी कर्ज होते. ते एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४० लाख कोटी केले. हे सरकार केवळ आकड्यांचा जुगाड करून सत्य लपवत आहे. सध्याच्या वर्तमानातील सर्वाधिक कमकुवत पक्ष कोण असेल तर नरेंद्र मोदी आणि भाजपा पक्ष आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी जिंकलेल्या जागांचा पाढा वाचून दाखवत. महाविकस आघाडी जर पुढे एकत्र लढली तर २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप एकेरी आकड्यात निवडून येतील असा दावा आज येथे वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी केला आहे.

केंद्रीय यंत्रणांचा राजकारणासाठी वापर या विषयावर राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी ‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज्यात नरेंद्र मोदी व भाजपकडून सत्तेचा होणारा गैरवापर याबाबात त्यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत विश्लेषण केले. ते म्हणाले,’ एखादी निवडणूक समोर आल्यावर भाजपकडून नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे केला जातो. परंतु आता त्याच चेहऱ्यावर आपल्याला प्रश्न उपस्थित करायला हवे, असे थेट आवाहन त्यांनी केले. प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगवेगळी असू शकते. मात्र २०१४ सालापासून राजकारणातील माणुसकी ही संकल्पना निघून गेली. सत्ता स्थापन करण्यासाठी कुठल्याही थराला लोक जात आहेत. भाजपा पक्षात प्रवेश करण्यासाठी एखाद्या व्यक्तीमागे ईडी, सीबीआयची चौकशी असणे किंवा एखादा घोटाळा करणे गरजेचे आहे असा थेट आरोप वानखेडे यांनी केला.

महाराष्ट्राची राजकीय ताकद काय हे सांगताना वानखेडे म्हणाले की, महाराष्ट्राची राजकीय ताकद शरद पवार साहेब आहेत. देशात भाजपा विरहित कोणत्याही राजकीय पक्षाला काही प्रश्न केला तर ते पवार साहेबांकडे बोट करून ते काय विचार करतात असे विचारतात. ही आपली ताकद आहे, असे वानखेडे यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. त्यामुळे पवार साहेबांना ताकद देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. २०२४ च्या निवडणुकीत विरोधकांना संधी आहे. सध्याच्या वर्तमानातील सर्वाधिक कमकुवत पक्ष कोण असेल तर नरेंद्र मोदी आणि भाजपा पक्ष आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी जिंकलेल्या जागांचा पाढा वाचून दाखवला. याउलट २०१९ सालच्या झालेल्या कमी जागांचा पाढाही त्यांनी वाचला. त्यामुळे महाविकस आघाडी २०२४ मध्ये जर एकत्र लढली तर २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा एकेरी आकड्यात निवडून येतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

त्याचबरोबर आपण सर्वांनी महाराष्ट्रातील प्रश्नासोबत राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नही विचारात घ्यायला हवे. २०२४ च्या निवडणुकामध्ये भाजपाच्या जागा कमी झाल्या तर त्यांच्यामध्ये विद्रोह होईल. भाजपामध्ये लोक धुसमूसत आहेत, असे त्यांनी सांगितले.

तुम्ही जरी महाराष्ट्रात निवडणूक लढवत असले तरी राष्ट्रीय पातळीच्या मुद्द्यांवर मोदी सरकारची पोलखोल केली पाहिजे. त्याच्या शिवाय लोकांनी जी अफीम खाल्ली आहे ‘तो आएगा तो मोदी ही..’ ती उतरणार नाही. त्या उलट नवीन टॅगलाईन देण्याची ‘जाएगा तो मोदी ही… ‘ही संकल्पना जनमानसात रुजवली पाहिजे, असे आवाहन वानखेडे यांनी सर्व विरोधी पक्षांना केले.

देश स्वतंत्र झाल्यानंतर २०१४ पर्यंत देशावर ५४ लाख कोटी कर्ज होते. ते एकट्या मोदींनी १४० लाख कोटी केले. हे सरकार केवळ आकड्यांचा जुगाड करून सत्य लपवत आहे. ते सत्य बाहेर आणण्याची गरज आहे, असे वानखेडे यांनी नमूद केले. मोदी सरकारने कर्ज उपलब्ध करून देशाची अर्थव्यवस्था कशी व्यवस्थित आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करते. परंतु यामध्ये खूप मोठी तफावत असून देशाचे नुकसान होत आहेत याचे अर्थशास्त्रीय विश्लेषण यावेळी वानखेडे यांनी यावेळी सादर केले.

एक लक्षात ठेवा महाराष्ट्रात एकही उद्योग या पुढे येणार नाही. जो पर्यंत वरती डाकू बसले आहेत व राज्यात गद्दार किल्लेदार बसलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून उद्योग प्रकल्प गेले. सेमी कंडक्टर प्रकल्प आला असता महाराष्ट्राला चांगले उत्पन्न मिळाले असते व रोजगारही मोठ्या प्रमाणात मिळाला असता. टाटा एअरबस कंपनीच्या प्रकल्प महत्त्वाचा होता. त्या ऐवजी दोन हजार कोटीचा इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प दिला. तो प्रकल्प आपल्याकडे असणाऱ्या एमआयडीसीच्या धर्तीवर आहे. अशा प्रकारे धुळफेक केली जाते. जीएसटी कलेक्शन मध्ये गुजरात महाराष्ट्राच्या अर्ध्यावरही नाही. जेव्हा विमान विकली जातील तेव्हा किती जीएसटी जमा होईल. हे भविष्याचे प्लॅनिंग भाजपावाले करत आहे. त्यामुळे येणाऱ्या २०२४ निवडणुकीत ‘जाएगा तो मोदी ही’ या संकल्पनेवर सर्व विरोधकांनी एकत्र येऊन लढावे, तरच हेच चित्र बदलेल, अशी अपेक्षा अशोक वानखेडे यांनी व्यक्त केले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *