Breaking News

शरद पवार यांच्या राजीनामा प्रकरणाचा सस्पेन्स कायम आणखी दोन दिवसानंतर राजीनामा निर्णयावर शक्यता

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी पक्षातून दबाव वाढला असला तरी या संदर्भात पक्षीय स्तरावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. राजीनामा मागे घेण्याबाबत पवार यांनी पक्षाच्या नेते आणि पदाधिकारी यांच्याकडे दोन तीन दिवसांचा अवधी मागितला असल्याने याबाबतचा निर्णय नंतर होईल, अशी माहिती जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसेच आज पक्षाची कोणतीही बैठक झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार आज सकाळी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे गेले होते. याठिकाणी ते तीन तास होते. या दरम्यान राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते देखील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे गेले होते. त्यांनी पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची आज बैठक असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दुपारी चार वाजता शरद पवार वाय. बी. चव्हाण सेंटर येथून आपल्या सिल्व्हर ओक निवासस्थानी निघाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

आज वाय बी चव्हाण सेंटरला शरद पवार नेहमीप्रमाणे आले. ते नेहमी इथे येतात आणि लोकांच्या भेटीगाठी घेतात. ते नेहमीप्रमाणे वाय. बी. चव्हाण सेंटरला आले. त्यांनी अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसची आज कोणतीही बैठक बोलावली नव्हती. बैठकीसाठी नेते आले नव्हते, फक्त पवार यांना भेटायला नेते आणि पदाधिकारी आले होते, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

शरद पवार यांनी काल सांगितल्याप्रमाणे दोन दिवस जाऊद्या. कदाचित त्यानंतर ते आपला निर्णय जाहीर करतील, असे पटेल म्हणाले.

जयंत पाटलांना पवारांचा फोन

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पूर्व नियोजित कार्यक्रमाला पुण्यात गेले होते. यावेळी शरद पवार यांनी जयंत पाटील यांना फोन केला. त्यांना तातडीने मुंबईत येण्यास सांगितल्याचे आणि जयंत पाटील मुंबईत दाखल झाले.
दरम्यान, पवार यांनी राजीनाम्याचा फेर विचार करावा अशी मागणी केल्याची माहिती, जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड यांनी आज केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *