Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर ईडीचे छापेः कार्यकर्त्ये आक्रमक निवासस्थानाबाहेर पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न

साधारणतः चार वर्षापूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्यानंतर भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत मनिलॉंन्डरींग केल्याचा गंभीर आरोप केला. त्यावेळी त्यांच्या घरावर छापेमारी झाली. मात्र त्यावेळी आयकर विभागाने त्यांच्या घरासह कारखान्याचीही झडती घेतली. मात्र त्यावेळी काहीही आढळून आले नाही. आज बुधवारी पुन्हा चार वर्षानंतर सकाळी सकाळी ईडीने आज हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुणे येथील निवासस्थानासह मुलाच्या, मुलीच्या घरी छापेमारी केली.

छापेमारीचे वृत्त पसरताच मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर एकच गर्दी करत भाजपा आणि ईडीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अखेर मुश्रीफ यांनाच घरातून एक व्हिडिओ जारी करत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करावे लागले.

या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडीकडून केलेल्या कारवाईची माहिती दिली. तसेच भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

दरम्यान, भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याबाबत दिलेल्या ऑफरबाबत विचारलं असता, मुश्रीफ यांनी हसत-हसत उत्तर देण्याचं टाळलं. तोच प्रश्न पुन्हा विचारला असता, मुश्रीफ यांनी ‘असं कसं होईल’ असे विधान केले.
दुसरीकडे, ईडीने केलेल्या कारवाईची माहिती देताना हसन मुश्रीफ म्हणाले, आज सकाळी सहा वाजल्यापासून ईडीने माझ्या निवासस्थानी, मुलांच्या आणि मुलीच्या घरावर, मुलांच्या कारखान्यावर छापे टाकले. पुण्यातही काही व्यक्तींच्या घरावर ईडीने छापेमारी केली. ही कारवाई करण्याआधी ईडीने मला कोणत्याही प्रकारची नोटीस अथव समन्स बजावले नव्हते. संबंधित कारखान्याशी माझा काहीही संबंध नाही. या कारखान्यावर चार वर्षांपूर्वी प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. तपासण्या झाल्याचे सांगितले.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर आतापर्यंत मी तीनवेळा पत्रकार परिषद घेऊन उत्तरं दिली आहे. तो खुलासा केल्यानंतरही किरीट सोमय्यांनी नव्याने माझ्यावर तेच आरोप केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात दीड कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्यात आला आहे. तसेच मानहानीचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *