Breaking News

राज्यपालांबाबतचे अजित पवारांचे ते वक्तव्य अखेर खरे ठरले… अमित शाह आणि नरेंद्र मोदी मला पदमुक्त करत नाहीत

काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठीकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना डि.लीट पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केली. त्यावरून वाद निर्माण झाला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले की, राज्यपाल कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून राहण्यास इच्छुक नसून हे पद सोडण्याची इच्छा आपल्याशी बोलताना दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

अखेर अजित पवार यांनी जाहिर केलेल्या त्या माहितीची कबुलीच राज्यपालांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आज दिली. त्यामुळे अजित पवार यांचे ते वक्तव्य खरे ठरल्याचे बोलले जात आहे.

त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी सांगितले होते, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी रहायचे नसल्याने ते त्याबाबतची विनंती सातत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करत आले. मात्र अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे आपल्याला पद मुक्त करत नसल्याचेही राज्यपालांनी आपल्याला सांगितल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.

अजित पवारांनी राज्यपालांबाबत दिलेल्या माहितीची हीच ती बातमीः-https://www.marathiebatmya.com/political/opposition-leader-ajit-pawar-revelled-discussion-with-the-governor-koshyari-why-the-governor-repeatedly-talks-like-this-acts-like-this-and-why-remains-silent-about-the-ruling-party-is-a-puzzle-for-mah/

कदाचित त्यामुळेच राज्यपाल कोश्यारी हे जाणीवपूर्वक महापुरूषांबद्दल वक्तव्य केले असावे अशी शक्यताही अजित पवार यांनी व्यक्त केली होती.

त्यानुसार राज्यपाल भगतसिग कोश्यारी यांनी आज ट्विटरद्वारे आणि राजभवनाने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये अजित पवारांनी दिलेली माहितीच पुन्हा उद्कृत केल्याने अजित पवार यांच्या तेव्हाच्या वक्तव्यांना एकप्रकारे पुष्टी मिळत आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *