Breaking News

मनसेने आंदोलन करण्यापूर्वीच घेतलं मागे बाळा नांदगांवकर म्हणाले, ती पक्षाची भूमिका नाही नो टू हलाल आंदोलनावरून मनतेच दोन तट

काही दिवसांपूर्वी अवेळी होणाऱ्या भोंग्यावरील अजाणच्या विरोधात मनसेने आंदोलन हाती घेतले. त्या आंदोलनाला चांगले यश मिळाल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला. त्यानंतर मुस्लिम समुदायाकडून हलाल पध्दतीने प्राण्यांची कत्तल करण्यात येत असल्याच्या विरोधात मनसेकडून आंदोलन हाती घेण्यात आली असल्याचे मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी जाहिर केले. मात्र काही वेळात ही अधिकृत पक्षाची भूमिका नसल्याचे सांगत नो टू हलाल आंदोलन सुरु होण्यापूर्वीच बारगळल्याचे दिसून आले.

हलाल अर्थव्यवस्थेतून जमा होणारा पैसा दहशतवादाच्या अंमलबजावणीसाठी वापरला जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. त्यामुळे ‘नो टू हलाल’ या मोहिमेत सामील होण्याचे मनसेकडून आवाहनही करण्यात आले होते. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी, शनिवारी पत्रकार परिषद घेत हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र किल्लेदार यांनी ‘नो टु हलाल’ मोहिमेबाबत मांडलेली भूमिका अधिकृत नसल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

बाळा नांदगावकर म्हणाले की, आमच्या एका कार्यकर्त्याने ती मागणी केली आहे, मात्र ती पक्षाची भूमिका नाही. ‘नो टू हलाल’ ही पक्षाची भूमिका नाही. जोपर्यंत पक्षप्रमुख एखादी मागणी करत नाही तोपर्यंत ती पक्षाची भूमिका होत नाही. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे उचित नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान नुकत्याच झालेल्या मनसेच्या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टोल विरोधात आंदोलन पुकारले होते. त्यास यश मिळाले. मात्र मनसैनिक त्यानंतर लोकांशी किती कनेक्ट झाले असा सवाल करत लोकांमध्ये जावून लोकांचे प्रश्न समजून घेवून सोडविल्याशिवाय निवडणूकीत यश मिळत नसल्याचे सांगितले. तसेच आगामी निवडणूकांच्यादृष्टीने विजयी होण्यासाठी जे काही करता येईल ते करा असे आदेशही दिले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *