Breaking News

१२ हजार पोलीस शिपायांची भरती लवकरच: राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी

पोलीस शिपाई संवर्गातील १२ हजार ५२८ पदे १०० टक्के भरण्यात येत आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या ४ मे २०२० च्या शासन निर्णयातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १२ हजार पोलिस शिपायांची भरती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. त्यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मांडण्यात आला. त्यावर मंत्रिमंडळाने मंजूरीची मोहोर उमटविल्याने भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला निर्देशित केले आहे.

पोलीस शिपाई संवर्गातील २०१९ या वर्षामधील ५२९७ पदे तसेच २०२० या वर्षामधील ६७२६ पदे व मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२ हजार ५२८ पदे १०० टक्के भरण्यात येतील.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *