Breaking News

राष्ट्रवादीला निरंजन डावखरेंची अखेर सोडचिठ्ठी पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला वैतागून दिला राजीनामा

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्व. वसंत डावखरे यांचे सुपुत्र तथा आमदार निरंजन डावखरे यांनी पक्षांतर्गत ठाणे जिल्ह्यातील पक्षातंर्गंत कुरघोडीला कंटाळून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा आज दिला. तसेच उद्या सकाळी भाजप प्रदेश कार्यालयात त्यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देण्याआधी आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबतची कल्पना दिली होती. तसेच ठाणे जिल्ह्यातील पक्षाचे विद्यमान नेत्यांकडून आपल्याला राजकारणातून बाजूला सारण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. त्याचबरोबर पक्षाच्या संघटनात्मक कामातूनही आपल्याला बाजूला सारण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. त्यामुळे अखेर आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आज सकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना भेटून पक्ष आणि आमदाराकीचा राजीनामा दिल्याचे निरंजन डावखरे यांनी सांगितले.

निरंजन डावखरे हे सध्या कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे आमदार होते. विधानपरिषदेचे सदस्य निरंजन डावखरे यांची मुदत पुढच्या महिन्यात संपत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका पुढच्या महिन्यात  होणार आहेत. या पार्श्वभूमीवर डावखरे यांना भाजपात प्रवेश देवून भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. भाजपकडून डावखरे यांनी कोकण पदवीधर मतदार संघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *