Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची काँग्रेसची तक्रार सत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा सरकारकडून गैरवापर केल्याचा सचिन सावंत यांचा आरोप

पालघर : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षातर्फे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सत्तापैसा,धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा प्रचंड दुरुपयोग सुरु आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे सराईत दोषी झाले असून त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

काँग्रेस शिष्टमंडळाने आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिका-यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार केली.

गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री जनतेला खोटी आश्वासने देऊन, अमिषे दाखवून आणि निर्णय घोषित करून पदाचा दुरुपयोग व आदर्श आचारसंहितेचा भंग करीत आहेत. कल्याण डोंबिवली महानगपालिका व पेण नगरपालिका निवडणुकीत त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. परंतु दुर्देवाने त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. २० मे रोजी मुख्यमंत्र्यांनी पालघर लोकसभा क्षेत्रात भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभांमध्ये खावटी कर्ज माफ करूपालघरला वैद्यकीय महाविद्यालय उभारूवसई विरार महापालिका क्षेत्रातून २९ गावे वगळू अशा घोषणा केल्या त्यावर निवडणूक आयोगाने याची स्वतः दखल घेऊन कारवाई करणे अभिप्रेत होते परंतु आयोगाने कारवाई न कल्याने नाईलाजाने काँग्रेस पक्षाला तक्रार करावी लागली असे सांगून निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली आहे काअसा प्रश्न जनमानसाच्या मनात उपस्थित होत आहे असे ते म्हणाले.

या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे सत्ता व पैशाचा प्रचंड गैरवापर सरु असून पोलीस व महसूल अधिकारी यांचा वापर प्रचारासाठी केला जात आहे. पालघर लोकसभा क्षेत्रात अतिवरिष्ठ पोलीस व महसूल अधिकारी हॉटेलात मुक्कामी राहून काय करत आहेत? पालघरमधील क्लब वन व इम्पिरीयल या दोन्ही हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी अशी मागणी सावंत यांनी केली. भाजपने आपल्या प्रचारासाठी एका मोठ्या बिल्डर नेत्याशी संबंधीत धर्मस्थळाचा बॅक ऑफिससाठी उपयोग केला आहे कायाबाबत भाजपने स्पष्टीकरण द्यावे असे सावंत म्हणाले.

भारतीय जनता पक्षातर्फे आपला मतदारसंघही वाचवता न आलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट अर्थात योगी आदीत्यनाथ यांना केवळ धार्मिक ध्रुवीकरण करण्याकरिता पाचारण केले असून सदर नेता हा योगी नसून ढोंगी आहे. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवून त्याजागी मनुवादी विचारांच्या दीनदयाळ उपाध्याय यांचा पुतळा का उभारलायाचे उत्तर देशाच्या जनतेला द्यावे असे सावंत म्हणाले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *