Breaking News

कंगना राणावतला “मलाना क्रिम”चा ओव्हर डोस झालाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

कोट्यवधी भारतीयांचा आणि स्वातंत्र्यसेनानी यांचा अपमान करणार्‍या अभिनेत्री कंगना राणावत हीला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने काढून घ्यावा अशी मागणी करत तीच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.

देशाला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात केले होते. त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

१८५७ पासून स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली. लाखो स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी यांनी या देशात एक मोठा लढा निर्माण केल्याने ब्रिटिशांनी स्वतंत्र भारत करण्याची घोषणा केली. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. एवढं बलिदान असताना कंगना राणावत ही अभिनेत्री मलना क्रिमचा ओवरडोस झाल्यासारखी काहीही बोलते अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.

यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने एक शिष्टमंडळ लवकरच ईडी कार्यालयात जाणार असून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांवर दाखल करण्यात आलेल्या ईडी केसेसचे काय झाले याची विचारणा करण्यासाठी आणि त्यासंदर्भात असलेली कागदपत्रेही त्यांना दिली जाणार आहेत. तसेच याप्रकरणात ईडी एक प्रसिध्द पत्रक काढून याबाबतची माहिती जनतेला द्यावी अशी मागणी केली.

Check Also

यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *