Breaking News

मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्त पदी देवेन भारती, गृह खात्याची नव पद निर्मिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या आदेशान्वये नियुक्ती

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबई पोलिस आयुक्तावर कोणाची नियुक्ती करावी यावरून वाद झाल्याची चर्चा सुरु झाली. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानकपणे आपल्या साताऱ्यातील मूळ गावी गेल्याची माहिती पुढे आली होती. त्या गोष्टीला पुष्टीला देणारी घटना आज घडली असून मुंबई पोलिस प्रशासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच विशेष पोलिस आयुक्त पद निर्माण करत फडणवीस यांचे लाडके आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आल्याचा शासन निर्णयही आज राज्य सरकारकडून जारी करण्यात आला. विशेष म्हणजे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकिय निवासस्थानी भेटीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी मुंबई पोलिस पांडे यांच्यानंतर रश्मी शुक्ला यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

सत्तेत स्थिरावल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या तिसऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलिस आयुक्त पदी परमबीर सिंग यांच्या नावासाठी मुख्यमंत्री शिंदे हे आग्रही होते. तर रश्मी शुक्ला यांच्या नावासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्यात चांगलाच वाद झाल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिस प्रशासनात विशेष पोलिस आयुक्त पदाची निर्मिती करत देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली.

हाच तो शासन निर्णय

Check Also

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *