Breaking News

माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांची सीआयडीमार्फत चौकशी गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे विधानसभेत आश्वाासन

मुंबई : प्रतिनिधी

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे  (एसआरए) माजी मुख्याधिकारी विश्वास पाटील यांनी केलेल्या गैरव्यवहाराची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येईल. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल महिन्याभरात सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असल्याचे आश्‍वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानसभेत दिले.

विधानसभा सदस्य शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सेवा निवृत्तीच्या अखेरच्या कालावधीत मान्यता दिलेल्या १३७ प्रकरणांपैकी ३३ प्रकरणात गैरप्रकार व अनियमितता आढळून आल्या प्रकरणी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला.

जुहूतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत दोन अलिशान सदनिका मिळवून गैरव्यवहार केल्याचेही आढळून आले. या प्रकरणातील महत्वाची फाईल प्राधिकरणातून गहाळ झाल्याप्रकरणी निर्मल नगर पोलिस ठाण्यात ३० नोव्हेंबर २०१७ रोजी गुन्हाही दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

विश्वास पाटील यांच्या कार्यकाळातील जून २०१७ मध्ये त्यांनी निकालात काढलेल्या सर्व १३७ प्रकरणांची सखोल तपासणी करण्यासाठी ४ सदस्य समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आपला अहवालही शासनाला सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

तर विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी १३७ प्रकरणांपैकी ३३ प्रकरणांमध्ये अनियमितता आढळून आल्याने त्यांची चौकशी स्वत: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सचिव यांच्या मार्फत करण्यात येत असल्याने यात निष्पन्न काय होणार? अशी शंका विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली.  या सर्व ३३ प्रकरणांची सविस्तर माहिती सादर करणार का? असा प्रश्‍न विधानसभा सदस्य सुनिल प्रभू यांनी उपस्थित केला. त्यानुसार या सर्व ३३ प्रक़रणांची सविस्तर यादी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल, असे आश्‍वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिले.

तसेच कुटें समितीचा अहवालही सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल, असे आश्‍वासन वायकर यांनी सदस्य राजेश टोपे यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना दिले.

 

Check Also

श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! निजामने केली पुनमची निघृण हत्या

मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *