Breaking News

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर दसऱ्यानंतर सुनावणी यंदाचा दसरा तुरुंगातच

पत्रा चाळ पुर्नवसन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यावर आज सुनावणी होऊन जामीन अर्जावर पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे संजय राऊत यांचा दसरा कारागृहातच होणार असल्याचे स्पष्ट झाले.

गोरेगाव येथील पत्रा चाळ पुर्नवसन प्रकल्प गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजाणी संचालनालयाने अर्थात ईडी ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज २७ सप्टेंबर सुनावणी पार पडली. मात्र, आजच्या सुनावणीत संजय राऊत यांना दिलासा मिळाला नाही आहे. आता जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

पत्रा चाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सुरुवातीपासूनच सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. पत्रा चाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असून अगदी सुरुवातीपासून ते प्रत्येक गोष्ट कृतीत आणण्यात राऊत यांचा सहभाग असल्याचा दावाही ईडीकडून आरोपपत्रात केला.

ईडीने दाखल केलेल्या आरोप पत्रात २००६-०७ साली पत्रा चाळीच्या पुनर्विकासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्या बैठकीत संजय राऊत म्हाडा अधिकारी व इतरांसह सहभागी झाले होते. त्यानंतर राकेश वाधवान या प्रकरणात सहभागी झाले. या प्रकरणात नियंत्रण राहावे म्हणून संजय राऊत यांनी प्रवीण राऊत यांना मोहरा म्हणून मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *