Breaking News

थर्मल मीटर-पल्स ऑक्सीमीटर तपासणी झाल्यावरच कार्यालयात प्रवेश उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडून नवी नियमावली जारी

मुंबई: प्रतिनिधी
मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून त्यापासून मंत्रालयातील अनेक विभागाचे कर्मचारी-अधिकारी अपवाद ठरले नाहीत. त्यामुळे या आजाराची वेळीच लागण लक्षात यावी या उद्देशाने मंत्रालयातील आपल्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी अधिकारी-कर्मचाऱ्यांची थर्मल मीटर आणि पल्स ऑक्सीमीटरची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या चाचणीत कर्मचारी-अधिकारी नॉर्मल निघाला तरच त्याला कार्यालयात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक शिपायाने मास्क शिल्ड व फेस मास्क, हॅण्डग्लोज घालणे बंधनकारक करण्यात आले आहेत.
प्रत्येकाने आपल्या कार्यासनात-दालनात बसण्यापूर्वी साबणाने स्वच्छ हात धुणे, किंवा सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.
कुणीही मास्क घातल्याशिवाय कार्यालय-छन्न मार्ग येथे फिरू नये.
सर्वानी भारतीय नमस्काराची पध्दत वापरावी, हस्तांदोलन टाळावे.
सर्व कॉम्प्युटर, प्रिंटर, किबोर्डला हात लावण्यापूर्वी सॅनिटाईज करून घ्यावेत त्यानंतरच त्याचा वापर करावा.
फाईल्स, दरवाजे, कपाट, लिफ्टचे बटन व टेबल यांना हात लावल्यानंतर हात सॅनिटायजरचा वापर अवश्य करावा.
कार्यालयात ए.सी.चा वापर टाळावा कार्यालयाचे सर्व खिडक्या उघड्या ठेवून नैसर्गिक हवेचा वापर करावा.
हात न धुता तोंड, नाक आणि डोळ्याला हात लावणे टाळावे.
जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत, एकत्रित जेवण टाळावे, शक्यतो कार्यालयात आपल्या जागीच बसून जेवावे.
सर्व अधिकाऱ्यांनी सादरीकरण करताना-झाल्यानंतर स्वच्छतेची काळजी घेवून फाईल वरिष्ठांकडे सोपवावी.
कार्यालयात आल्यानंतर एखाद्या कर्मचारी-अधिकाऱ्यास सर्दी-ताप-खोकला, श्वसनाचा त्रास असेल तर किंवा त्याची लक्षणे दिसत असतील तर त्याची माहिती तातडीने वरिष्ठांना द्यावी. जेणेकरून अशा कर्मचाऱ्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेता येवू शकणार आहे.
तसेच आजारी, अस्वस्थ असणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी याची माहिती वेळीच कार्यालयास द्यावी. जेणेकरून त्यांच्या रजा व इतर आस्थापनाविषयक बाबी वेळीच पूर्ण करता येतील.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *