Breaking News

रूग्ण सापडल्यानंतर मंत्रालय आणि प्रशासकिय इमारत दोन दिवसांसाठी बंद निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाची लागण मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना होवू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरकारला अखेर मंत्रालयातच या विषाणूची लागण झालेले रूग्ण सोमवारी सापडले. त्या विषाणूचा प्रादुर्भाव इतरांनाही होवू नये यासाठी मंत्रालय, नवीन प्रशासकिय इमारतीत निर्जंतुकीकरण करण्यासाठी दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
२९ आणि ३० एप्रिल या दोन दिवशी मंत्रालय आणि त्यासमोरील नविन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.
कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उदभवली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालय आणि नविन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचे निर्जंतुकीकरणाचे करण्यात येणार आहे.

Check Also

महापारेषणच्या पडघे-कळवा उपकेंद्रात भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित

महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात आज दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी ४०० के. व्ही. अति उच्च दाब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *