Breaking News

गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागासाठी ५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभागाचा निर्णय

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक गणेशमंडळांनी ५ सप्टेंबर २०२३ पूर्वी [email protected] या ईमेलवर अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरिता स्पर्धा आयोजन करून अभिप्रायासह गुणांकन करून प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहे. समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करून तीन गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडिओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याकडे १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सादर करावेत.
निकालासंदर्भात स्वतंत्र सूचना देण्यात येतील. जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नवी मुंबई मेट्रोच्या खर्चात २९१ कोटींची प्राथमिक वाढ

१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिडको नवी मुंबई मेट्रो मार्गिका क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या बेलापूर ते पेंधर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *