Breaking News

महाराष्ट्रातील या ८ जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ आणि तुरुंग अधिकारी, होमगार्डसाठी पदक पाच कर्मचाऱ्यांना ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्रातील अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि गृहरक्षक (होम गार्ड ) तसेच नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक आज जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण १३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
‘राष्ट्रपती शौर्य पदक’ उल्लेखनीय सेवांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ तसेच ‘शौर्य पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ दरवर्षी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना जाहीर केली जातात. वर्ष २०२३ साठी ५३ जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा समावेश आहे.
शौर्य आणि पराक्रम गाजवल्याबद्दल ०३ जवानांना ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा शौर्य पदक’ आणि एका जवानाला ‘अग्निशमन सेवा शौर्यपदक’ जाहीर झाले आहे.
उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’, ८ कर्मचाऱ्यांना, उल्लेखनीय सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ आणि ४१ कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा कामगिरीसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा समावेश आहे.
देशातील ४८ कर्मचाऱ्यांना, स्वयंसेवकांना गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदकांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ तसेच उल्लेखनीय सेवेसाठी ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ अनुक्रमे ०५ कर्मचारी / स्वयंसेवक आणि ४३ कर्मचारी/ स्वयंसेवकांना जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर करण्यात आली आहेत.

राज्यातील ‘अग्निशमन सेवा पदके’ आणि ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर झालेल्यांची यादी सोबत जोडली आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी अग्निसेवा पदक

1. श्री. करीमखान फजलखान पठाण, फायर इंजिन चालक

2. श्री. कसाप्पा लक्ष्मण माने, फायरमन

3. श्री. नरसिंह बसप्पा पटेल, रुग्णवाहिका परिचर (आग)

4. श्री. रवींद्र नारायणराव अंबुलगेकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी

5. श्री. दीपक कालीपाद घोष,उपमुख्य अग्निशमन अधिकारी

6. श्री. सुनील आनंदराव गायकवाड, उपअधिकारी

7. श्री. पराग शिवराम दळवी, लीडिंग फायरमन

8. श्री. तातू पांडुरंग परब, फायरमन

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी होम गार्ड आणि नागरी संरक्षण पदक

1. श्री. तुषार चंद्रकांत वरंडे, सेंटर कमांडर (एचजी)

2. श्री. अय्युबखान अहमदखान पठाण,ऑफिसर कमांडिंग (HG)

3. श्री. राजेंद्र पांडुरंग शहाकर,होमगार्ड

4. श्री. सुधाकर पांडुरंग सूर्यवंशी, नागरी संरक्षणाचे वरिष्ठ सहायक उपनियंत्रक (सीडी)

5. श्री. विजय जनार्दन झावरे, फायर रेस्क्यू लीडर (नागरी संरक्षण)

महाराष्ट्रातील १७ तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक जाहीर
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवांसाठी विविध पदके आज जाहीर करण्यात आली आहेत. तुरुंग कर्मचाऱ्यांनी केलेल्या सुधारात्मक सेवांसाठी देखील पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण १७ तुरुंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील तुरुंग कर्मचाऱ्यांची यादी :-
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदक

1. श्री. सुनील निवृत्ती धमाल, अतिरिक्त अधीक्षक वर्ग 1

2. श्री. प्रकाश बाबुराव उकरंडे, जेलर ग्रुप 1

3. श्री. तात्यासाहेब सदाशिव निंबाळकर, जेलर ग्रुप 1

4. श्री. आनंद शंकर हिरवे, सुभेदार

5. श्री. गणेश पांडुरंग घोडके, हवालदार

 

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक

1. श्री. अनिल हणमंत खामकर, अधीक्षक वर्ग 1

2. श्री. वामन तुकाराम निमजे, जेलर गट 1

3. श्री. विजय ज्ञानेश्वर कांबळे, जेलर ग्रुप 1

4. श्री. तानाजी कृष्ण धोत्रे, जेलर ग्रुप 2

5. श्री. किशोरीलाल सुकराम रहांगडाले, सुभेदार

6. श्री. विजय लाडकू पाटील, सुभेदार

7. श्री. प्रकाश महादेव सातपुते, सुभेदार

8. श्री. चंद्रकांत नारायण बोसोडे, सुभेदार

9. श्री.बाबासाहेब हनुमंत चोरगे, हवालदार

10. श्री. दत्तात्रय किसन भोसले, हवालदार

11. श्री. अशोक कुंडलिक आडाळे, शिपाई

12. श्री. सुधाकर रामकृष्ण माळवे, शिपाई

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, हेमंत करकरे यांची हत्या कसाबने नव्हे तर आरएसएसच्या…

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) माजी प्रमुख हेमंत करकरे यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *