Breaking News

नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी
परतीच्या पावसाने राज्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केले असून सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली.
अहमदनगरच्या शेतकर्‍याने सोयाबीनचे उभं पीक पेटवून दिले. याचा अर्थ सरकारला शेतकर्‍यांच्या अडचणी कळत नसल्यानेच शेतकरी इतक्या टोकाची भूमिका घेत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
तर दुसरीकडे आमचे नेते शरद पवार शेतकर्‍यांच्या शेताच्या बांधावर जात त्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत शेतकर्‍यांची आस्थेने चौकशी करत आहेत. त्यामुळे त्यावर कोणती उपाययोजना करायची यावर पक्षाच्यावतीने निश्चित विचार केला जाणार आहेच. शिवाय याप्रकरणी राज्यपालांची भेट घेण्याचे निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

ED चे आदेश प्रताप सरनाईक हाजीर हो.. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहा

मुंबईः प्रतिनिधी एमएमआरडीतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *