Breaking News

अर्थविषयक

विमा क्षेत्रातील धोरणाबाबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी देशात सर्वाधिक ५० टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात असून नवीन धोरणामुळे ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विमा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी असून या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आपण लक्ष घालणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मँग्नेटीक महाराष्ट्र-२०१८ मधील परकीय गुंतवणूकदारांच्या राऊंड टेबल चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. …

Read More »

पर्यायी इंधन वापर धोरणामुळे राज्यात उद्योगांना मोठी संधी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८' : 'इमरजिंग टेक्नॉलॉजी इन सेक्टर्स' परिसंवाद

मुंबई: प्रतिनिधी देशाने वाहनांसाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण स्विकारले असून यासाठी महाराष्ट्राने इलेक्ट्रीक वाहन धोरण लागू केल्याने राज्यात उद्योगांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे, असे मत ‘इमरजिंगटेक्नॉलॉजी इन सेक्टर्स’ या चर्चा सत्रात सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले. बीकेसी येथे एमएमआरडीए मैदानावरील मॅग्नेटीक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स २०१८ या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेमध्ये इमर्जिंग टेक्नॉलॉजी इन सेक्टर्स हा परिसंवाद झाला. यावेळी महिंद्रा आणि महिंद्रा उद्योगाचे कार्यकारी संचालक डॉ. पवन गोयंका, कानपूर आयआयटीचे प्रा. सिध्दार्थ पांडा, टाटा पॉवर आणि सोलर सिस्टीम्सचे आशिष खन्ना, सीआयआयचे सुमित सिन्हा, हिंदुजा सिस्टिम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल माहेश्वरी, एनडीटीव्हीच्या पर्यावरण रिपोर्टर गार्गी रावत …

Read More »

भारत- महाराष्ट्र हे चुंबकीय देश आणि राज्य मँग्नेटीक महाराष्ट्रातील उद्योजकांची मते

उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी साब इंडियाचे अध्यक्ष जेन वाईडस्ट्रॅाम म्हणाले की, गुंतवणूकीच्या दृष्टीने खरेच हे चुंबकीय क्षेत्र आहे. चुंबकीय देश,चुंबकीय राज्य आणि चुंबकीय नेतृत्त्व असा संगम झाला आहे.भारत योग्य अशा मार्गावर वाटचाल करत आहे. साहजिकच महाराष्ट्राचे मार्गक्रमणही तसेच आहे. मेक-इन इंडिया हे धोरण हे शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण असून संशोधन आणि विकासाची वृत्ती …

Read More »

देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८ चे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य देशातील पहिले ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल करणारे राज्य असून देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले होते. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर आयोजीत ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ जागतिक गुंतवणूक दारांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह …

Read More »

व्यापार तूट तीन वर्षांच्या उच्चांकावर जानेवारीत १६.३ अब्ज डॉलर व्यापार तूट

नवी दिल्ली: प्रतिनिधी केमिकल्स, इंजिनिअरिंग आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत चांगली वाढ झाल्याने जानेवारी महिन्यात देशाची निर्यात ९ टक्क्याने वाढून २४.३८ अब्ज डॉलरवर पोहोचली. त्यामुळे निर्यातीबाबत दिलासा मिळाला असला तरी व्यापार तूटीबाबत मात्र सरकारला झटका बसला आहे. व्यापार तूट तीन वर्षांच्या उच्चांकावर गेली आहे. जानेवारीत १६.३ अब्ज डॉलर व्यापार तूट राहिली …

Read More »

मँग्नेटीक महाराष्ट्र मधून १० लाख कोटींच्या गुंतवणूकीची अपेक्षा पंतप्रधान मोदींच्या हस्ते मँग्नेटीक महाराष्ट्रचे उद्घाटन : उद्योगमंत्र्याची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी मँग्नेटीक महाराष्ट्र कर्न्वजन्स-२०१८ चे १८ ते २० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात १० लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे लक्ष्य असून ४ हजार ५०० कंपन्यांबरोबर सामंज्यस करार करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. मलबार हिल …

Read More »

पंजाब नँशनल बँकेत ११ हजार कोटींचा घोटाळा मुंबईतील शाखेतील घोटाळा उघडकीस मात्र बँकेची चुप्पी

मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) तब्बल ११ हजार ३३० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. बँकेने हा घोटाळा आणि अनधिकृत व्यवहारांचा शोध लावला आहे. हे व्यवहार बँकेच्या मुंबईतील शाखेतून झाले असून बँकेकडून बुधवारी असे व्यवहार झाल्याची माहिती उघडकीस आणली. या वृत्तानंतर शेअर बाजारातील पीएनबीचे शेअर्स ५.७ …

Read More »

१४ महिन्यातील मोठ्या घसरणीने ४ लाख ९५ हजार कोटींचा फटका शेअर बाजार तिसऱ्या दिवशीही पुन्हा गडगडला

मुंबई: प्रतिनिधी जागतिक शेअर बाजारातील घसरणीमुळे देशातील शेअर बाजार मंगळवारी जोरदार आपटला. सलग सहाव्या दिवशी झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची अक्षरक्ष दाणादाण उडाली. काही मिनिटातच अब्जावधी रुपयांचा फटका गुंतवणूकदारांना बसला. सेन्सेक्स सकाळी उघडताना तब्बल १२७५ अंकांनी कोसळून ३३ हजार ४८२.८१ वर उ़घडला. तर निफ्टीही ३९० अंकांनी कोसळत १० हजार २८० वर उघडला. १४ महिन्यातील …

Read More »

आणि ३५ हजाराच्या खाली सेनक्सेस उतरला सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण

मुंबई : प्रतिनिधी एक वर्षावरील शेअर्सच्या नफ्यावर दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर आकारण्याची अर्थसंकल्पात करण्यात आलेली घोषणा आणि जागतिक शेअर बाजारातील घसरण याचा परिणाम देशातील शेअर बाजारावर सोमवारीही दिसून आला. सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार घसरून सेन्सेक्स ३५ हजाराच्या खाली आला. सकाळी बाजार मोठ्या घसरणीनेच उघडले. त्यानंतर सेन्सेक्स ५४५ आणि निफ्टी …

Read More »

नोटबंदीत १५ लाख जमा करणाऱ्यांच्या अडचणी वाढणार सीबीडीटीने २ लाख लोकांना पाठवली नोटीस

नई दिल्ली: प्रतिनिधी नोटबंदीच्या काळात बँक खात्यात १५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करणाऱ्यांसाठी आता वाईट बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर बँक खात्यात १५ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा करणाऱ्या २ लाख लोकांना नोटीस पाठवली आहे. सीबीडीटीचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी …

Read More »