Breaking News

व्यापार तूट तीन वर्षांच्या उच्चांकावर जानेवारीत १६.३ अब्ज डॉलर व्यापार तूट

नवी दिल्ली: प्रतिनिधी

केमिकल्स, इंजिनिअरिंग आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत चांगली वाढ झाल्याने जानेवारी महिन्यात देशाची निर्यात ९ टक्क्याने वाढून २४.३८ अब्ज डॉलरवर पोहोचली. त्यामुळे निर्यातीबाबत दिलासा मिळाला असला तरी व्यापार तूटीबाबत मात्र सरकारला झटका बसला आहे. व्यापार तूट तीन वर्षांच्या उच्चांकावर गेली आहे. जानेवारीत १६.३ अब्ज डॉलर व्यापार तूट राहिली आहे.
आयातीत सातत्याने वाढ होत असल्याने व्यापार तूटही वाढत आहे. जानेवारी महिन्यात देशाच्या आयातीत २६.१ टक्के वाढ झाली असून ४०.६८ अब्ज डॉलरची आयात झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. देशात कच्च्या तेलाची आयात अधिक वाढल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये व्यापार तूट १६.८६ अब्ज डॉलर राहिली होती. त्यानंतर आयताची तूट ही उच्चांकी आहे. आयात आणि निर्यातीमधील फरक म्हणजे व्यापार तूट होय. मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात ९.९० अब्ज डॉलरची व्यापारी तूट राहिली होती.

Check Also

अमेरिकेने चिनी आयात मालावरील शुल्कात केली वाढ चीनी मालावर अघोषित बंदी?

अनेक चिनी वस्तूंवर शुल्क वाढवण्याचा निर्णय अमेरिकेच्या जो बिडेन सरकारने घेतला आहे. “कोविड-19 साथीच्या आजारानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *