Breaking News

एसीबीच्या बेजबाबदारपणामुळे कृपाशंकर सिंह निर्दोष एसीबीच्या महासंचालकांची मात्र चुप्पी

औरंगाबाद : जगदीश कस्तुरे

विधानसभा अध्यक्षांची परवानगी नसताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१२ साली कृपा शंकरसिंग यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. एसीबी कोर्टाने कृपाशंकरसिंह यांची निर्दोष मुक्तता करत बेजबाबदार कारवाई बद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फटकारले. या प्रकरणी एसीबीचे महासंचालक विवेक फणसाळकर यांनी मात्र चुप्पी साधली.

कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या विरोधात खटला चालवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाच्या परवानगी आवश्यक असते. मात्र विधानसभा अध्यक्षांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला अर्थात एसीबीला ही परवानगी नाकारली होती. तरीही तत्कालीन आमदार कृपाशंकर सिंह यांच्यावर २०१५ साली आरोपपत्र दाखल केले होते. एसीबीने विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत दंडेलशाही केल्याचा युक्तीवाद कृपा शंकरसिंग यांच्या वकीलाने कोर्टात केला. तो युक्तीवाद ग्राह्य धरुन एसीबी कोर्टाने कृपाशंकरसिंग यांना दोषमुक्त केले. दरम्यान २०१६ सालीही कृपाशंकरसिंग यांनी एसीबीला आरोपपत्र रद्द करावे म्हणून विनंती केली होती. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. या प्रकरणात कृपाशंकरसिंग यांची पत्नी मालती, मुलगा नरेंद्र मोहन, सुन अंकिता आणि जावाई विजयसिंह हे सुध्दा आरोपी होते.

काँग्रेसच्या आरोपानुसार कृपाशंकर यांनी केंद्रीय मंत्री सत्यपालसिंह यांची मदत घेऊन भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती.त्यानंतर कृपाशंकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत वरचेवर भेट होऊ लागली. हा घटनाक्रम एसीबी न्यायालयात दाखल झालेल्या स्र्टींग आरोपपत्रातून सुटण्याकरता कारणीभूत ठरल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे.

Check Also

अंबादास दानवे यांचा आरोप, नरेंद्र मोदींच्या सभेसाठी शासकीय यंत्रणेचा वापर

राज्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून लोकसभा निवडणूक २०२४ चे कामकाज सुरु झाले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *