Breaking News

पर्यायी इंधन वापर धोरणामुळे राज्यात उद्योगांना मोठी संधी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८' : 'इमरजिंग टेक्नॉलॉजी इन सेक्टर्स' परिसंवाद

मुंबई: प्रतिनिधी

देशाने वाहनांसाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण स्विकारले असून यासाठी महाराष्ट्राने इलेक्ट्रीक वाहन धोरण लागू केल्याने राज्यात उद्योगांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे, असे मत ‘इमरजिंगटेक्नॉलॉजी इन सेक्टर्स’ या चर्चा सत्रात सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.

बीकेसी येथे एमएमआरडीए मैदानावरील मॅग्नेटीक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स २०१८ या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेमध्ये इमर्जिंग टेक्नॉलॉजी इन सेक्टर्स हा परिसंवाद झाला. यावेळी महिंद्रा आणि महिंद्रा उद्योगाचे कार्यकारी संचालक डॉ. पवन गोयंका, कानपूर आयआयटीचे प्रा. सिध्दार्थ पांडा,

टाटा पॉवर आणि सोलर सिस्टीम्सचे आशिष खन्ना, सीआयआयचे सुमित सिन्हा, हिंदुजा सिस्टिम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल माहेश्वरी, एनडीटीव्हीच्या पर्यावरण रिपोर्टर गार्गी रावत यांनी सहभाग घेतला.

डॉ. गोयंका म्हणाले, प्रदूषण रोखणे, पारंपरिक इंधनाचा वापर कमी करणे आदींसाठी इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढणेगरजेचे आहे. केंद्र सरकारने यासाठी पावले उचलताना राज्यांनी यासाठी कायदेव नियमांमध्ये सुधारणा कराव्यात यासाठी आवश्यक  उद्योग, वाहने आदी धोरण बनविण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कार्यवाही महत्वपूर्ण ठरली  आहे. राज्याने मागच्या आठवड्यात धोरण घोषित केले आहे. यामुळे या क्षेत्रातील वाटचालीची रुपरेखा सर्वांसमोर आली आहे.

आंतरराष्ट्रीयस्तरावर या क्षेत्रात असलेली स्पर्धा पाहता यातील देशाच्या प्रगतीसाठी जगाच्या  नकाशावर वैशिष्ट्यपूर्णस्थान निर्माण करणारे ठरेल. चीनने आठ वर्षांपूर्वी या गोष्टीला प्राधान्य  देऊन आपल्या क्षमता वाढीसाठी पावले टाकली आहेत, असे डॉ.गोयंका म्हणाले.

याप्रसंगी खन्ना म्हणाले, सौर ऊर्जा उत्पादनात ८० ते १०० गिगा वॅट क्षमतेने वाढ होत असूनजागतिक स्थिती पाहता यामध्ये ७४८ गिगा वॅट क्षमता वाढीची गरज आहे. यामध्ये असणारे अडथळे कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु असून पर्यावरण, आरोग्य आदींचा विचार करता उर्जेचा हा स्त्रोत दुर्लक्षित करता येणे शक्य नाही.

फ्लेक्झीबल इलेक्ट्रानिक्समधील संधींचा वेध घेताना आयआयटीचे प्रा. पांडा यांनी उद्योजकांनी यामध्येगुंतवणुकीसाठी पुढे येण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, इलेक्टॉनिक्स मटेरिअल वापराची व्याख्या यामुळे बदलतेआहे. पारंपरिक पध्दतीऐवजी पॉलिमर्ससारख्या मुलभूत मटेरिअलचा येथेवापर होणार असून त्याचा वापर सेन्सर्सच्या सूक्ष्म उत्पादनामध्ये होऊन किंमत, ऊर्जा वापर यामध्ये यामुळे क्रांती दिसून येईल.

सिन्हा यांनी नवीकरणीय ऊर्जा वापरामुळे बदलणारे तंत्राचे फायदे त्यातील मर्यादा विषद करताना यामुळेसंशोधनाच्या संधी महत्वपूर्ण आहेत असे सांगितले. ते म्हणाले, इलेक्ट्रीक वाहनांमधील बॅटरीच्या वापरामुळे या क्षेत्रातीलमागणी मोठ्या प्रमाणात आहे. याला शासनाचे धोरण पूरक ठरणार आहे. या संधींचा वेध घेतला जावा.

कपिल माहेश्वरी  यांनी  सौर उर्जा उत्पादनासाठी भौगालिक क्षेत्राची गरज असून त्यासाठी  रहिवासी  क्षेत्रातील रुफ टॉपसंकल्पना हा कळीचा मुद्दा ठरुन त्याचा आर्थिक परिणाम नागरीकांना लाभदायक ठरु शकतो. यासाठी सर्वस्तरापर्यंतजनजागृती व्हावी,  असे त्यांनी सांगितले.

Check Also

जिओचा नवा मनोरंजन प्लॅन अवघ्या ८८८ रूपयात या ओटीटी प्लॅनचे आनंद लुटता घेता येणार

जिओने अलीकडेच एक आकर्षक पोस्टपेड प्लॅन लाँच केला आहे ज्यात उत्साही स्ट्रीमर्सना लक्ष्य केले आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *