Breaking News

विमा क्षेत्रातील धोरणाबाबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी

देशात सर्वाधिक ५० टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात असून नवीन धोरणामुळे ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विमा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी असून या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आपण लक्ष घालणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मँग्नेटीक महाराष्ट्र-२०१८ मधील परकीय गुंतवणूकदारांच्या राऊंड टेबल चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्रातील लंडनच्या उद्योगांना येणाऱ्या समस्याबाबत आपण मोकळेपणाने सांगितले. त्याबद्दल आपले आभार. आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार पुढाकार घेईल यासाठी नोडल अधिकारी नेमला जाईल अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी लंडनच्या शिष्टमंडळाला दिली.  यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल,एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, उद्योग विभागाचे आयुक्त हर्षदीप  कांबळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व युकेच्या  शिष्ठमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

ब्रिटिश उच्च हाय कमिशन उप-उच्चायुक्त क्रिस्पिन सायमन यांच्या नेतृत्वात विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राउंड टेबल चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे यासाठी टाटाच्या सहकार्याने नागपूर आणि पुणे येथे कौशल्य विकास केंद्र उभारले जात आहे. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पूरक वातावरण आहे. त्यामुळे परदेशी उद्योग या ठिकाणी येण्यास उत्सुक असतात असे शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले. मॅग्नेटिक महाराष्ट्र या परिषदेच्या निमित्ताने राज्याने पुन्हा एकदा आपला उद्योगाप्रती सकारात्मक दृष्टिकोन जगासमोर ठेवला आहे. महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सुरक्षित राज्य असून महाराष्ट्राची बाजारपेठ आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. ‘मेक इन इंडिया’मुळे आमच्या उद्योग व्यवसायाला बळकटी मिळाली असल्याचे अनेक सदस्यांनी सांगितले.

दळणवळण सुविधांचा विस्तार

मुंबई पुणे चाकण यासह संपूर्ण राज्यात दळणवळण सुविधांचा विस्तार केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फ्रान्स च्या शिष्टमंडळाला दिली.  नवी मुंबई विमानतळावरून पहिले विमान डिसेंबर २०१९ ला उड्डाण करेल असे मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या काही  दिवसात सरकारने ३० नवीन धोरणे तयार केली असून ती अधिक पारदर्शक आहेत. महानगरात मेट्रोचे जाळे तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. सोबतच जल वाहतूक सुरू करण्यावर भर दिला जणार आहे. या सगळ्या सुविधा सिंगल तिकीट असतील. पुढील दोन वर्षात पुण्यात ६०० ई-बसेस धावतील. त्याचप्रमाणे एक्सप्रेस हायवे उभारले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य हे गुंतवणूकदाराच्या दृष्टीने सक्षम केले जाणार आहे. आपण जास्तीत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात करावी असे आवाहन त्यांनी केले.

मुंबईत आर्थिक सुविधा केंद्र उभारणार

महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक यावी व गुंतवणूकदारांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी मुंबई येथे आर्थिक सुविधा केंद्र उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत राज्य शासन गुंतवणूकदारांशी संवाद साधण्यास नेहमी तयार राहणार आहे. उद्योगांसाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा तात्काळ पुरविण्यावर शासनाचा भर राहील. सर्व परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे.  मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या निमित्ताने जास्तीत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात करावी असे अवाहनही त्यांनी अमेरिकेचे उच्चायुक्त सी.जी. कॅगन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला राउंड टेबल चर्चे दरम्यान केली.

Check Also

जिओचा नवा मनोरंजन प्लॅन अवघ्या ८८८ रूपयात या ओटीटी प्लॅनचे आनंद लुटता घेता येणार

जिओने अलीकडेच एक आकर्षक पोस्टपेड प्लॅन लाँच केला आहे ज्यात उत्साही स्ट्रीमर्सना लक्ष्य केले आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *