Breaking News

आणि ३५ हजाराच्या खाली सेनक्सेस उतरला सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण

मुंबई : प्रतिनिधी
एक वर्षावरील शेअर्सच्या नफ्यावर दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर आकारण्याची अर्थसंकल्पात करण्यात आलेली घोषणा आणि जागतिक शेअर बाजारातील घसरण याचा परिणाम देशातील शेअर बाजारावर सोमवारीही दिसून आला. सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार घसरून सेन्सेक्स ३५ हजाराच्या खाली आला.
सकाळी बाजार मोठ्या घसरणीनेच उघडले. त्यानंतर सेन्सेक्स ५४५ आणि निफ्टी १७३ अंकांनी कोसळला होता. मात्र, त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, आयटीसी,  भारती एअरटेल, टाटा मोटर्स आदी हेवीवेट शेअर्समध्ये झालेल्या खरेदीने बाजार सावरला. सेन्सेक्समध्ये ३०० अंकांची सुधारणा झाली. तर निफ्टीही ११० ने सुधारला. दिवस अखेरीस सेन्सेक्स ३०९ ने घसरून ३४ हजार ७५७ वर बंद झाला. तर निफ्टी ९४ ने घटून १० हजार ६६६ वर स्थिरावला.
अर्थसंकल्पात १० टक्के दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर आकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे घसरण चालू असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, वित्तीय सचिव हसमुख अढिया यांनी बाजारातील घसरणीला जागतिक शेअर बाजारातील कमजोर परिस्थितीला जबाबदार धरले आहे.  दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर हा शेअर बाजारातील विक्रीला कारणीभूत नसल्याचे अढिया यांचे म्हणणे आहे.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने १ फेब्रुवारीला व्याजदरामध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे अमेरिकेत बाँड यील्ड वाढण्याच्या भितीने शुक्रवारी अमेरिकी बाजारात मोठी घसरण झाली. अमेरिकेत १० वर्षाचे बाँड यील्ड २.८५ टक्क्यांवर पोहचले. अमेरिकी बाजारातील घसरणीचा परिणाम सोमवारी आशियाई बाजारांच्या घसरणीत झाला. त्यामुळे देशातील बाजारातही नकारात्मक वातावरण राहिले.

Check Also

एसबीआयमध्ये १२ हजार फ्रेशर्सना संधी ८५ टक्के आयटी क्षेत्रातील नवतरूणांना प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणून नियुक्त्या

एसबीआय SBI, देशातील सर्वात मोठी असलेल्या बँकेत, FY25 मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि सहयोगी म्हणून १२,००० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *