Breaking News

ग्रामीण ढंगाची प्रेमकथा ‘वंटास’ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई : प्रतिनिधी

एखाद्या विशिष्ट फॅार्ममधील सिनेमा बॅाक्स ऑफिसवर हिट झाला की त्यानंतर त्याच पठडीतील बरेच सिनेमे पाहायला मिळतात. मराठी सिनेमांच्या बॅाक्स ऑफिसवर सध्या ग्रामीण बाजाच्या सिनेमांचा ट्रेंड सुरू आहे. ‘सैराट’ या सिनेमाने मिळवलेल्या यशानंतर ‘वंटास’ हा आणखी एक ग्रामीण ढंगाच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ग्रामीण चित्रपटांच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या ‘वंटास’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. या चित्रपटातील ‘टिपूर टिपूर….’ हे गाणं यापूर्वीच लोकप्रिय झालं असून, ४ मे पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुरूकृपा प्रॉडक्शन एंटरटेन्मेंटच्या अमोल बापूराव लवटे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ज्ञानेश्वर यादवराव उमक यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

‘वंटास’ ही कथा आहे गौरी आणि आंब्या यांची… उनाडक्या करणारा आंब्या गौरीच्या प्रेमात पडतो आणि तिला मिळवण्यासाठी त्याला काय काय करामती कराव्या लागतात, याची गोष्ट ‘वंटास’मध्ये आहे. अजय वरपे, स्नेहल साळुंखे, अक्षय माहूलकर, रमेश वेदपाठक, मृणालिनी रानावरे, मनमोहन माहिमकर, प्रदीप नवले हे कलाकार चित्रपटात आहेत. सुदर्शन महामुनी यांनी चित्रपटाची कथा आणि संवाद लेखन केलं आहे. हरीश राऊत आणि ज्ञानेश्वर उमक यांनी पटकथा लिहिली आहे. वलय आणि सुदर्शन महामुनी यांनी लिहिलेल्या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. शैलेश जाधव यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन जागेश्वर ढोबळे यांचे आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *