Breaking News

न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यू प्रकरणी अर्थमंत्र्यांच्या मेव्हूण्याची नार्को टेस्ट करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

न्यायमुर्ती ब्रिजमोहन लोया यांच्या संशयित मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळण्यात आली. मात्र न्या. लोया यांचे पोस्ट मार्टेम करणारे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मेव्हुणे डॉ.मकरंद व्यवहारे यांची नोर्को टेस्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

बँलार्ड पिअर्स येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

न्याय मिळण्याची परिस्थिती आता देशात राहिली नाही. दिवंगत न्यायमूर्ती लोया यांच्यासंदर्भात सर्वोच्च नाययालयाने दिलेल्या निकालानंतर लोकांची अशी भावना झाली आहे. लोया यांच्या शव विच्छेदन अर्थात पोस्ट मार्टेम अहवालावर आधारित हा निकाल देण्यात  आला आहे.  नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये ज्यांच्या अधिकारात शव विच्छेदन अहवाल तयार केला, ते डॉ.  मकरंद व्यवहारे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मेव्हणे आहेत . नागपूर मेडिकल कॉलेजच्या  फॉरेन्सिक लॅबचे ते प्रमुख होते. पदावर कार्यरत असताना २०१५ साली व्यवहारे  शव विच्छेदन अहवाल बदलतात असा आरोप  त्यांच्याच विद्यार्थ्यांनी केला होता. 2014 साली ही त्यांनी अहवाल बदलला नसेल हे कशावरून ठरवायचे असा सवाल हि मलिक यांनी केला .  त्यामुळे  लोया प्रकरणातले सत्य बाहेर काढायचे असेल तर डॉ. व्यवहारे यांची नार्को टेस्ट करावी,अशी मागणी त्यांनी केली.

 

 

 

Check Also

अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *