Breaking News

मराठी सिनेमाच्या प्रेमात सोनू ‘सलमान सोसायटी’चा सोनूच्या हस्ते मुहूर्त

मुंबई : प्रतिनिधी

सलमान खानसोबत ‘दबंग’मध्ये छेदीलाल ही व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारत पुन्हा प्रकाशझोतात आलेला अभिनेता सोनू सूद सध्या दक्षिणात्य सिनेमांसोबतच मराठीच्याही प्रेमात दिसतो. प्रादेषिक भाषांमधील सिनेमे हृदयाला भिडणारे असल्याचं मानणाऱ्या सोनूच्या मते मराठी सिनेमाचा झेंडा आज डौलाने फडकत आहे. ‘सलमान सोसायटी’ या मराठी सिनेमाच्या मुहूर्त प्रसंगी बोलताना सोनूने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

आज सोनू सूद हे नाव जगभरातील सिनेचाहत्यांच्या चांगलंच परिचयाचं झालं आहे. खलनायकी भूमिकांसोबतच सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकांमध्येही वेगळे रंग भरणाऱ्या सोनूच्या हस्ते लेखक-दिग्दर्शक कैलाश पवार यांच्या ‘सलमान सोसायटी’ या पहिल्या मराठी सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. या प्रसंगी सोनूने मुहूर्ताचा क्लॅप दिला. त्यानंतर ‘सलमान सोसायटी’च्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात आला. प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या सोनूच्या मनात मराठी सिनेमांबाबत आपुलकीची भावना आहे. याच कारणामुळे पवार यांनी जेव्हा सोनूला मुहूर्तासाठी आमंत्रित केलं, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्याने होकार दिला. आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत सोनूने मुहूर्ताचा क्लॅप देत ‘सलमान सोसायटी’च्या टिमला शुभेच्छा दिल्या. एका वेगळ्या विषयावरील ‘सलमान सोसायटी’ हा सिनेमा आपण आवर्जून पाहणार असल्याचं सोनू म्हणाला.

चंद्रकांत पवार आणि रेखा सुरेंद्र यांनी प्राजक्ता एन्टरप्रायझेस आणि ए. आर. एन्टरप्रायझेस या बॅनरखाली ‘सलमान सोसायटी’ या चित्रपटाची निर्मिती सु्रू केली आहे. या सिनेमाची कथा ‘​पढ़ेगा इंडिया ​तो बढ़ेगा इंडिया’वर आधारित आहे. या चित्रपटाद्वारे बाल शिक्षणाकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या सिनेमाला विनोदीची खुमासदार फोडणीही देण्यात येणार आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *