Breaking News

राज्यात इलेक्ट्रिक मोबिलिटीवर आधारित वाहतूक व्यवस्था उभारण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही बांद्रा- कुर्ला संकुलातील हायब्रीड बस सेवेचा शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी

वाहतूक कोंडी व वाहनांच्या प्रदुर्षणावर सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर हाच उपाय असून यापुढील काळात १०० टक्के इलेक्ट्रिक मोबिलीटीवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून भविष्यात सर्व बसेस या इलेक्ट्रिकवर चालविल्या जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमएमआरडीए’च्या वतीने बांद्रा कुर्ला संकुलात सुरू करण्यात आलेल्या हायब्रीड बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने चालविण्यात येणाऱ्या २५ हायब्रीड बसेसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृहात झाला. यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते प्रमुख पाहुणे होते. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यु.पी.एस. मदान, सहआयुक्त प्रवीण दराडे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, टाटा मोटर्सचे सुशांत नाईक, गिरीश व्यास आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या महत्वाच्या योजनेत मुंबई व एमएमआरडीएचा समावेश केल्याबद्दल केंद्र शासन आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांचे आभार मानून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बांद्रा कुर्ला संकुलात मोठ्या प्रमाणात गाड्या येत असल्यामुळे वाहतूक कोंडी व प्रदूषण होत आहे. ‘एमएमआरडीए’ने उड्डाणपूल बांधून सिमलेस वाहतुकीसाठी उपाय योजना केल्या आहेत. कितीही रस्ते बांधले तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर झाल्याशिवाय ही कोंडी कमी होणार नाही. सार्वजनिक वाहतूक हाच यावरचा उपाय आहे. भविष्यात इलेक्ट्रिक वाहतूक व्यवस्थेकडे जावे लागणार आहे. पुढील काळात सर्व बसेस या संपूर्ण इलेट्रिकवर आणण्यात येतील. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही इलेट्रिक मोबिलिटीवर आणण्यात येणार आहे असून त्यासाठीचे चार्जिंग धोरण तयार केले आहे. मुंबईतील ‘बेस्ट’ला सुद्धा आपल्या सर्व बस या इलेक्ट्रिक कराव्या लागणार आहेत. यासाठी केंद्र व राज्य सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल.

‘एमएमआरडीए’च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या हायब्रीड बस बांद्रा कुर्ला संकुलात येणाऱ्याना नक्कीच आवडतील. वातानुकूलित, वायफाय आरामदायी अशा या बस असल्यामुळे यामधून लोकांना कामही करता येईल. या बसेसमुळे बीकेसीमध्ये येणाऱ्या गाड्याची संख्या कमी होईल. तसेच ३० ते ४० टक्के प्रदूषण सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी या हायब्रीड बस सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केला.

बेस्टसाठी आणखी ८० इलेक्ट्रिक बस देणार – अनंत गीते

श्री. गीते म्हणाले, केंद्र शासनाच्या अवजड उद्योग मंत्रालयामार्फत फेमा इंडिया या विशेष योजनेतून एमएमआरडीएला या बसेससाठी अनुदान देण्यात आले आहे. अवजड उद्योग मंत्रालयाच्या या नाविण्यपूर्ण योजनेत सहभागी होण्यासाठी देशातून सर्व प्रथम राज्य शासन व एमएमआरडीएने तयारी दर्शविली. कोणत्याही नव्या कल्पनांना व उपक्रमांना बळ देण्याचे काम महाराष्ट्राने व मुंबईने नेहमीच केले आहे. या हायब्रीड बसमुळे ३० टक्क्यांपर्यंत प्रदुर्षण कमी होण्यास मदत होणार आहे. शून्य प्रदुषण हे उद्दिष्ट असून त्यासाठी उद्योगांना सोबत घेऊन जाण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे.

मुंबईतील बेस्ट ही नावाप्रमाणेच बेस्ट असून अवजड उद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘बेस्ट’ला यापूर्वी ४० इलेक्ट्रिक बसेस देण्यात आल्या आहेत. लवकरच ८० बसेस देण्यात येणार असल्याचेही श्री. गीते यांनी यावेळी सांगितले.

हायब्रीड बसची वैशिष्ट्ये

  • ३१ अधिक १ अशा आसन क्षमतेच्या एकूण २५ बसेस चालविणाऱ्या जाणार
  • बोरिवली, ठाणे, मुलुंड, खारघर ते बांद्रा कुर्ला संकुल या मार्गावर चालणार
  • सकाळी ७.३० ते ८.३० आणि सायं. ६ ते ७ या वेळेत फेऱ्या चालणार
  • तसेच बांद्रा कुर्ला संकुल परिसरात तसेच जवळच्या रेल्वे स्थानक दरम्यान शटल सेवा
  • बेस्ट मार्फत ही सेवा चालविण्यात येत आहे.
  • भारतातील हायब्रीड श्रेणीतील मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादित पहिली बस
  • हायब्रीड तंत्रज्ञानामुळे कार्बन उत्सर्जनावर ३० टक्के बचत
  • इतर बसच्या तुलनेत २८.२४ टक्के इंधन बचत
  • संपूर्ण इलेक्ट्रॉनिक किंवा फ्युएल सेलमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता
  • संपूर्ण वातानुकुलित, टीव्ही, वायफाय, सीसीटीव्ही सुविधा
  • आरामदायी आसन व्यवस्था, दिव्यांगासाठी विशेष आसन व व्हिलचेअरसाठी उताराची व्यवस्था
  • गिअरलेस व क्लचलेस कार्यपद्धती
  • जीपीआरएस यंत्रणा

 

Check Also

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्याने लॉकअपमध्येच केली आत्महत्या

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अनुज थापन (३२) …

One comment

  1. These are in fact impressive ideas in concerning blogging.
    You have touched some pleasant factors here. Any way
    keep up wrinting.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *