Breaking News

आता प्रेक्षकच म्हणणार ‘Once मोअर’ लवकरच रसिकांच्या भेटीला चित्रपट येणार

मुंबई : प्रतिनिधी

अनोख्या शीर्षकांच्या सिनेमांसाठी मराठीसृष्टी नेहमीच चर्चेत असते. एखाद्या साध्याशा शब्दाचा शीर्षकस्थानी ठेवून एखादी कथा सादर करण्यात मराठी दिग्दर्शकांचा हातखंडा असल्याचं जगभरातील सिनेरसिकांना ठाऊक आहेत. एका आगामी सिनेमाचं शीर्षकही याला अपवाद नाही. एखादा परफॅार्मन्स किंवा गोष्ट आवडल्यास की मुखातून आपोआप ‘वन्स मोअर’ हे शब्द बाहेर पडतात, पण आता याच शीर्षकाने एक मराठी सिनेमा बनला आहे. या सिनेमाचं शीर्षकच ‘Once मोअर’ असं आहे.

वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन तसेच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Once मोअर’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. सोशल साईट्सवर या पोस्टरला चांगला प्रतिसाद मिळतोय.

एखादी गोष्ट आवडल्यानंतर त्याला ‘वन्स मोअर’ची दाद हमखास मिळते. पण ‘Once मोअर’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये एका व्यक्तीचा शोध दिसून येतोय. या शोध घेणाऱ्या व्यक्तिरेखेमुळे या चित्रपटात नक्की काय असावे याची उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाचं मोशन पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटात ‘कुछ हटके’ असल्याची जाणिव होते. हा शोध नेमका कशाचा आहे? शोध घेणारी ती व्यक्ती कोण? या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. या चित्रपटातून कोणता विषय हाताळण्यात येणार आहे ? या सगळ्या गोष्टींवरून लवकरच पडदा उठणार आहे. या चित्रपटाचं लेखन श्वेता बिडकर यांनी केलं असून दिग्दर्शन नरेश बिडकर यांचं आहे. धनश्री विनोद पाटील, देवस्व प्रोडक्शन या चित्रपटाचे निर्माते आहेत. विष्णू मनोहर, निलेश लवंदे, अभय ठाकूर सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने शेफ विष्णू मनोहर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करताहेत. चित्रपटाचं छायांकन संजय सिंग यांनी केलं आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *