Breaking News

अधिकाऱ्यांमधील वादानंतर अखेर डी.के.जैन यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती नागपूर कनेक्शन कामाला आल्याची मंत्रालयात चर्चा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील तीन ज्येष्ठ अधिकाऱ्यांमधील मुख्य सचिव पदावरील दाव्याच्या वादानंतर अखेर राज्याच्या मुख्य सचिव पदी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश जैन यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. जैन हे दुपारी ४.३० वाजता आज सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार मावळते मुख्य सचिव सुमित मलिक यांच्याकडून स्विकारतील.

डि.के.जैन हे भारतीय प्रशासन सेवेतील १९८३ च्या बँचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्यासोबत गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव, मदत व कार्य, पुर्नवसन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ या आहेत. सुरुवातीला या तीन अधिकाऱ्यांमध्ये राज्याच्या मुख्य सचिव पदावरून वाद निर्माण झाला होता. तसेच यातील दोन अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून परस्पर दावे करण्यात आले. त्यानंतर पुन्हा आमच्या बँचच्या कोणालाही राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करू नका अशी विनंती करत अन्य कोणालाही करण्याची विनंती केली.

यावादामुळे राज्याच्या वीज नियामक आयोगाच्या उपाध्यक्ष आणि सदस्य पदासाठी डी.के.जैन यांनी अर्ज केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची अखेर राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती केली.

जैन यांची नियुक्ती राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आल्याने यासाठी जैन यांचे नागपूरातील रेशीम बागेशी असलेले जुने संबध कामी आल्याची चर्चा मंत्रालयातील इतर आयएएस अधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.

अल्प परिचय :-

जेष्ठता यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले दिनेश कुमार जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २५ जानेवारी १९५९ साली जन्मलेले डी के जैन हे मूळ राजस्थानचे आहे. २५ ऑगस्ट १९८३ रोज़ी महाराष्ट्र राज्याच्या सेवेत रुजु झालेले जैन यांनी एम टेक मॅकेनिक आणि एम. बी.ए overseas porject bas असे शिक्षण घेतले आहे.

Check Also

नाना पटोले यांचा आरोप, मुंबईतील होर्डींग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे बीएमसी प्रशासन व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *