Breaking News

नयना मुकेला दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल पुरस्काराने गौरव

मुंबई : प्रतिनिधी

तसं पाहिलं तर कोणताही लहान मोठा पुरस्कार त्या व्यक्तीला काम करण्यासाठी उर्जा प्रदान करीत असतो. त्यात भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मिळणं म्हणजे आनंदाला पारावारच उरत नाही. अभिनेत्री नयना मुके सध्या हा आनंद अनुभवतेय. दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल पुरस्काराने नयनाच्या कलेचा गौरव करण्यात आला आहे.

अभिनयासाठी दिला जाणारा यंदाचा दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नयनाने पटकावला आहे. ‘फायनल डिसीजन’ या नाटकातील अप्रतिम अभिनयासाठी नयनाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या या फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार सोहळ्याला सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गजांनी हजेरी लावली होती. देहदान या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आधारित असलेल्या ‘फायनल डिसीजन’चं लेखन-दिग्दर्शन अनिल काकडे यांनी केलं आहे. नयनाने या नाटकात रेणुका नावाच्या तरुणीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेतील विविध कंगोरे रंगमंचावर सादर करण्यात यशस्वी ठरल्यानेच या पुरस्कारावर नाव कोरण्यातही नयनाला यश मिळालं आहे.

नयनाबाबत सांगायचं तर तिने यापूर्वी काही सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेत नयनाने साकारलेल्या लक्ष्मी मातेच्या भूमिकेचं घराघरात कौतुक झालं होतं. या भूमिकेसाठीही नयनावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.

याखेरीज ‘देवयानी’ या मालिकेतील नयनाच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘अनवट’ आणि संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा’ या मराठी चित्रपटांमध्येही नयनाने अभिनय केला आहे. सध्या नयनाला हिंदी सिनेसृष्टीचे वेध लागले असून हिंदी सिनेमांच्या ऑफर्सही तिच्याकडे असल्याचं समजतं.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *