Breaking News

संभाजी भिडेच्या अटकेसाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्महत्येचा प्रयत्न राहुरी तालुक्यातील रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता गणेश दिपक पवार

मुंबई : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथील दलित समुदायाच्या विरोधात दंगल घडविल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेला अटक करण्याच्या मागणीसाठी एका दलित कार्यकर्त्याने बुधवारी दुपारी मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर दलित कार्यकर्ता हा रिपब्लिक सेनेचा कार्यकर्ता असून गणेश दिपक पवार असे नाव असल्याचे समजते.

संपूर्ण राज्यभरातून भिमा कोरेगांव येथे १ जानेवारी २०१८ रोजी तेथील विजयी स्तंभास मानवंदना देण्यासाठी दलित बांधव जमा झाले होते. मात्र मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी येथील दलितेतर युवकांना भडकावित या दलित समुदायावर दगडफेक करत हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तसेच दलित समाजाच्या वाहनांवर दगडफेक करत त्याचे नुकसान केले. अखेर याप्रकरणी दलित समाजाच्या दबावाबरोबरच प्रसारमाध्यमातील टीकेमुळे अखेर मिलिंद एकबोटे यास अटक करण्यात आली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शक असलेल्या संभाजी भिडेला अटक करण्याचे धाडस राज्य सरकारकडून दाखविण्यात येत नव्हते.

भिडेच्या अटकेवरूनही विधिमंडळात मोठ्या प्रमाणावर विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडेला अटक करण्याऐवजी त्यांना क्लिनचीट दिली. त्यामुळे भारिप बहुजन-महासंघाचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठा मोर्चा काढत राज्य सरकारला सात दिवसाचा अल्टीमेटम दिला. मात्र त्यास दोन आठवड्यापेक्षाही जास्त कालावधी झाला तरी राज्य सरकारकडून अद्याप कोणतीच हालचाल झाली नाही. त्यामुळे अखेर बुधवारी मंत्रालयासमोर राहुरी येथील गणेश पवार या रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेऊन त्याची रवानगी मरिन लाईन्स पोलिस ठाण्यात  केली.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *